Mission Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mission Marathi Movie: साखळी बॉम्बस्फोटामागंच मोठं सत्य उलगडणार, सुरेखा कुडची यांचा 'मिशन'चा ट्रेलर प्रदर्शित

Mission Marathi Movie: ‘मिशन’ चित्रपटाच्या दमदार ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. साखळी बॉम्बस्फोट आणि हरवलेल्या २०० किलो RDXच्या शोधावर आधारित हा थरारपट १५ मे रोजी प्रदर्शित होणार.

Shruti Vilas Kadam

Mission Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ॲक्शन आणि थराराने भरलेल्या ‘मिशन’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, दमदार ॲक्शन सीन्स, थरारक कथा आणि कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दहशतवाद, साखळी बॉम्बस्फोट आणि हरवलेल्या आरडीएक्सच्या शोधाभोवती फिरणारी ही कथा १५ मे २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

‘मिशन’च्या ट्रेलरमध्ये सुरुवातीपासूनच रहस्य आणि थराराचा जबरदस्त अनुभव पाहायला मिळतो. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आधारित या काल्पनिक कथेत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातो. ३०० किलो आरडीएक्सपैकी १०० किलोचा वापर बॉम्बस्फोटात झाला, पण उरलेलं २०० किलो आरडीएक्स गेलं कुठे? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याची धडपड ‘मिशन’मध्ये पाहायला मिळणार आहे.

चित्रपटातील ॲक्शन सीन्स आणि शोध मोहिमेचे दृश्य प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहेत. विशेष म्हणजे मराठीतही उच्च दर्जाचे ॲक्शनपट तयार होऊ शकतात, याचं उत्तम उदाहरण म्हणून ‘मिशन’कडे पाहिलं जात आहे. ट्रेलरमध्ये पोलीस तपास, दहशतवादविरोधी कारवाया आणि रहस्यमय घडामोडींचा प्रभावी मेळ साधण्यात आला आहे.

चित्रपटात अभिनेते अजय शर्मा पोलीस इन्स्पेक्टरच्या दमदार भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या सोबत अनंत जोग, विजय पाटकर, शांती बावकर, सुरेखा कुडची, सिद्धेश आचरेकर, संकेत मोरे, ओम राणे, विपुल भोईर आणि नंदकुमार गोरुले यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

‘रेविकांता फिल्म्स’ निर्मित आणि ‘आकात डिस्ट्रिब्युशन’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती सौ. कांता शर्मा यांनी केली आहे. दिग्दर्शक चंद्रकांत विसपुते आणि कैलाश पवार यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. संगीताची जबाबदारी समीर खोले, मंदार कीर, रवींद्र खरात आणि विकी वाघ यांनी सांभाळली असून, गायक सुदेश भोसले यांच्यासह अनेक गायकांनी गाणी सादर केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

एका रात्रीत चेहरा चमकून निघेल! महागड्या क्रिम्सऐवजी चेहऱ्याला लावा फक्त ही एक गोष्ट

Face Care: चेहऱ्यावरील काळे डाग आणि खड्डे होतील कायमचे दूर, रात्री झोपताना १० मिनिटांसाठी लावा ही पेस्ट

भूकंपाने जमीन थरथरली, गूढ आवाजाने माणसं घाबरली; घर सोडून रस्त्यावर पळाले

रायगड ते रत्नागिरी प्रवास आता जलद; ‘वेश्वी-बागमांडला’ फेरीबोट सेवेची क्रेझ वाढली, कोकण पर्यटनासाठी मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT