Mirzapur 3 Poster Instagram
मनोरंजन बातम्या

Mirzapur 4 : 'मिर्झापूर ४' केव्हा येणार ?; अली फजलने दिली हिंट, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Mirzapur 4 Release On Ali Fazal : सध्या चाहत्यांमध्ये, 'मिर्झापूर ३' ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सीरीजची चाहत्यांमध्ये चर्चा पाहायला मिळत आहे. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती 'मिर्झापूर ४'ची.

Chetan Bodke

सध्या चाहत्यांमध्ये, 'मिर्झापूर ३' ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. एक तासांच्या १० एपिसोड्समध्ये, ही सीरीज रिलीज झालेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सीरीजची चाहत्यांमध्ये चर्चा पाहायला मिळत आहे. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती 'मिर्झापूर ४'ची. सीरीजचा चौथा सीझन येणार की नाही हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. 'मिर्झापूर ३'च्या शेवटच्या एपिसोडने आणखी एक सीझन येणार असल्याची हिंट दिली. चौथ्या सीझनबद्दल अली फजल म्हणजेच गुड्डू भैय्याने चाहत्यांना हिंट दिली आहे.

निर्मात्यांकडून किंवा दिग्दर्शकांकडून 'मिर्झापूर ४'ची घोषणा करण्यात आलेली नाही. या सीरीजचा दुसरा सीझन २०२० मध्ये प्रीमियर करण्यात आला होता. त्यानंतर तीन वर्षांनंतर सीरीजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मिडिया रिपोर्टनुसार, 'मिर्झापूर ४' २०२६ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. पण आता हा चौथा सीझन दोन वर्षांच्या अंतराने येणार आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांनी अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही.

'मिर्झापूर ३' रिलीज झाल्यानंतर अली फजलने 'इंडिया टुडे' ला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्याने सांगितले की, "ज्यावेळी 'मिर्झापूर' सीरीजचा पहिला सीझन रिलीज झाला त्यावेळी ही सीरीज इतकी हिट होईल, असं वाटलं नव्हतं. पण मला माहित होतं की, याचं कथानक गाजेल. कारण असं कथानक परदेशात मी पाहिलं होतं आणि त्यावर कामही केलं होतं. त्यामुळे मला खात्री होती की, या सीरीजचं कथानक चांगलंच गाजणार आणि प्रेक्षकांना आकर्षित करणार. प्रेक्षक नेहमीच युनिक कंटेंटच्या शोधात असतात."

मुलाखतीमध्ये पुढे अली फजल म्हणाला, "मिर्झापूर ३ आमच्यासाठी फार आव्हानात्मक होती. आम्ही सतत 'पुढचा सीझन चालेल का?' याच विचारात असायचो. मी केव्हाच इतर सीरीजसोबत तुलना करत नव्हतो. 'पीकी ब्लाइंडर्स' सोबतही आमच्या सीरीजची तुलना करत नव्हतो. त्या सीरीजचे खूप सीझन येत आहेत. त्यामुळे मला असं वाटायचं की, तुम्हाला जगाशी आणि तुम्ही ज्या भूमिका साकारत आहात त्यांचा योग्यरितीने ताळमेळ राखता आला पाहिजे आणि याच आव्हानावर आम्ही लक्ष केंद्रित करत होतो."

'मिर्झापूर ३'मध्ये प्रमुख भूमिकेत पंकज त्रिपाठीसह अली फजल, श्रिया पिळगावकर, श्वेता त्रिपाठी, रसिका डुगल, विजय वर्मा हे कलाकार आहेत. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी 'मिर्झापूर ३'ची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शन गुरमीत सिंह आणि आनंद अय्यर यांनी केले आहे. ही सीरीज ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर ५ जुलै २०२४ ला रिलीज झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

SCROLL FOR NEXT