Mirzapur 3 Bonus Episode SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mirzapur 3 Bonus Episode : पुन्हा राडा होणार, 'मिर्झापूर'चा मुन्ना भैय्या येतोय भेटीला

Mirzapur 3 : सर्वाचा लाडका मुन्ना भैय्या पुन्हा भेटीला येत आहे. मिर्झापूर 3 च्या बोनस एपिसोडची डेट रिलीज झाली आहे.

Shreya Maskar

मिर्झापूरच्या (Mirzapur 3) तिन्ही सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. हे प्रेम पाहून आता चाहत्यांसाठी बोनस एपिसोड घेऊन मुन्ना भैय्या आला आहे. या मालिकेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सीझनमध्ये, लोकांनी मुन्ना भैयावर भरपूर प्रेम केल आहे. या सिरीजमध्ये 10 भागांचा आनंद प्रेक्षकांना घेता आला. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे या सिरीजचा एक बोनस एपिसोड आला आहे. प्राइम व्हिडिओने मुन्ना भैय्याचे पुनरागमन केले आहे.

बोनस एपिसोड कधी रिलीज होणार?

प्राइम व्हिडिओने आपल्या इंस्टाग्रामवर मिर्झापूर 3 च्या बोनस एपिसोडचा टीझर रिलीज केला आहे. त्यात प्रेक्षकांचा लाडका मुन्ना भैय्या दिसला आहे. मिर्झापूर 3च्या लाँच झालेल्या प्रोमोमध्ये मुन्ना भैय्याने त्याच्या चाहत्यांसाठी स्पेशल मेसेज दिला आहे. व्हिडिओमध्ये मुन्ना भैय्या म्हणतोय की, "मी गेलो नाही म्हणून खूप मोठा गोंधळ झाला. मिरजापूर ३ मध्ये ज्या गोष्टी राहिल्या होत्या त्या आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. माझे चाहते मला खूप मिस करत आहेत हे मला माहिती आहे. फक्त माझ्या चाहत्यांसाठी एक नवीन गोष्ट मी घेऊन येत आहे." या वेळी काहीतरी वेगळ पाहायला मिळणार आहे. असा मेसेज मुन्ना भैय्याने दिला आहे. हा स्पेशल बोनस एपिसोड 30 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मिर्झापूर 3 स्टार कास्ट

मिर्झापूर सीझन 3 मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, ईशा तलवार, अंजुम शर्मा, प्रियांशू पैन्युली, हर्षिता शेखर गौर, राजेश तैलंग, शीबा चड्ढा, मेघना मलिक आणि मनु ऋषी हे कलाकार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsung Galaxy S26 Ultraचा लूक आला समोर; मार्केट जाम करणाऱ्या फोनची एक अन् एक गोष्टी झाली लीक

Banana Chips Recipe: कुरकुरीत केळीचे वेफर्स कसे बनवायचे?

प्रेमा तुझा रंग कसा? काकीच्या प्रेमात वेडा झाला; पुतण्याने काकाचा गळा चिरला

Maharashtra Politics: आता भाजपमध्ये बंड होणार? मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात एक गट सक्रिय, बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update : सरपंच प्रदीप चव्हाण मृत्यू प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेचा ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT