Ek Daav Bhootacha : सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे खेळणार 'एक डाव भुताचा', चित्रपट कधी होणार रिलीज?

Ek Daav Bhootacha Release Date : सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे यांची तुफान कॉमेडी तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. त्याचा आगामी चित्रपट एक डाव भुताचा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीज डेट जाणून घ्या.
Ek Daav Bhootacha Release Date
Ek Daav Bhootacha SAAM TV
Published On

मराठी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) आणि सिद्धार्थ जाधव यांचा भन्नाट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या जोडीने यापूर्वी 'दे धक्का' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. आता ही जोडी 'एक डाव भूताचा' (Ek Daav Bhootacha) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ek Daav Bhootacha Release Date
Bigg Boss Marathi : आधी राडा मग मिठी; निक्की-अरबाज पुन्हा एकत्र, नव्या गेम प्लॅनला सुरुवात

'एक डाव भूताचा' कधी रिलीज होणार?

सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि मकरंद अनासपुरे एकत्र म्हणजे कॉमेडी आणि मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता धमाल भूताचा डाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत. 'एक डाव भूताचा' हा ४ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

चित्रपटाची स्टार कार्स्ट

'एक डाव भूताचा' या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर नागेश भोसले,अक्षय कुलकर्णी,हर्षद नायबळ, मयूरी देशमुख,अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाची सुरेल गाणी गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांनी त्यांच्या मधुर आवाजात गायली आहेत.

Ek Daav Bhootacha Release Date
Deepika- Ranveer: दीपिका-रणबीरचा मोठा निर्णय, बाळासोबत ११९ कोटींच्या नव्या घरात करणार प्रवेश

या चित्रपटाची प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट यांनी केली आहे. रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संदीप मनोहर नवरे यांनी चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'एक डाव भूताचा' या चित्रपटाचे पटकथा लेखन संदीप मनोहर नवरे आणि डॉ. सुधीर निकम यांनी केले आहे. गौरव पोंक्षे यांनी छायांकन तर विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन केले आहे. तसेच गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.

Ek Daav Bhootacha Release Date
Fauji Marathi Movie: सौरभ गोखलेचा धडाकेबाज ‘फौजी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com