२५ तासांचा एकपात्री नाट्यप्रयोग; ‘मी सावली भीमाची’ नाटकाने रचला विश्वविक्रम  saam tv
मनोरंजन बातम्या

२५ तासांचा एकपात्री नाट्यप्रयोग; ‘मी सावली भीमाची’ नाटकाने रचला विश्वविक्रम

Babashabe ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्वलंत इतिहास सांगणारा ‘मी सावली भीमाची’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सलग २५ तास सादर करण्यात आला. या कामगिरीची इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

Girish Nikam

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्वलंत इतिहास सांगणारा 'मी सावली भीमाची' हा एकपात्री नाट्य प्रयोग सतत 25 तास सादर करून इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. जळगाव येथील नुतन मराठा महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये रंगकर्मी शरद भालेराव यांच्या 'मी सावली भिमाची' या एकपात्री नाट्यप्रयोगाला 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता सुरुवात झाली आणी 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजुन 30 मिनिटांनी प्रयोगाचा समारोप झाला. 1 तास 20 मिनिटांचा एक प्रयोग असे एकूण 22 प्रयोग सतत 25 तास सादर करून या एकपात्री प्रयोगाने विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. जळगाव येथील आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा जळगाव जळगावच्या वतीने हा प्रयोग सादर झाला

या आधी शरद भालेराव यांनी रांगोळीतुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 17  हजार स्क्वेअर फूटाचे पोर्ट्रेट काढले होते. त्याची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे. 'मी सावली भिमाची' हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करून त्यांनी दुसरा विक्रम केला आहे. विश्वविक्रम झाल्याचे प्रमाणपत्र, पदक आणि सन्मान चिन्ह नुकतेच इंटरनॅशनल बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून शरद भालेराव यांना प्राप्त झाले आहे.

२५ तासांचा एकपात्री नाट्यप्रयोग; ‘मी सावली भीमाची’ नाटकाने रचला विश्वविक्रम

रंगकर्मी असलेले शरद भालेराव जळगाव जनता बँकेचे कर्मचारी आहेत. यांच्या या विश्वविक्रमाचे नाट्यवर्तुळासह सर्वत्र कौतुक होत आहे. जळगावचे आमदार राजुमामा भोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भालेराव यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

आत्तापर्यंत 51 प्रयोग

'मी सावली भीमाची' या एकपात्री नाटकाचा पहिला प्रयोग 25 जानेवारी 2026 नुतन मराठा महाविद्यालयात झाला. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, वरणगाव, भुसावळ, धुळे, जालना, पुणे, अकोला, नासिक या ठिकाणी आतापर्यंत एकूण 51 प्रयोग झाले आहेत. सर्व प्रयोगांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात यापुढेही या एकपात्री नाटकाचे प्रयोग होणार आहेत.

या एकपात्री प्रयोगाचे लेखक शरद भालेराव असून दिग्दर्शक चिंतामण पाटील आहेत. तर पार्श्वसंगीत प्रबुद्ध भालेराव यांचे आहे. शरद भालेराव अनेक वर्षांपासून जळगावच्या रंगभूमीवर कार्यरत आहेत. जळगावच्या प्रसिद्ध खान्देश नाट्य प्रतिष्ठान या जुन्या संस्थेचे ते सक्रिय पदाधिकारी आहेत.

या नाट्य प्रयोगाच्या विश्वविक्रमासाठी किशोर सुर्यवंशी, नुतन मराठा महाविद्यालयाचे प्रा. एल. पी. देशमुख, ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शक चिंतामण पाटील, प्रबुद्ध भालेराव, विलास यशवंते, हरिश्चंद्र सोनवणे, विठ्ठल भालेराव, कुलदीप भालेराव, वैभव सोनवणे, संजय सुर्यवंशी यांनी सहकार्य केले.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसची रॅली

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! शिपायापासून सचिवांपर्यंत किती असेल पगार?

Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

Gold Rate Today : दसऱ्याआधी सोनं स्वस्त झालं की महागले? २४, २२, १८ कॅरेटचे ताजे दर आले समोर

SCROLL FOR NEXT