Priyanka-Nick
Priyanka-Nick Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka-Nick : प्रियांका-निकबद्दलच्या वक्तव्यावर चाहते भडकले, काय म्हणाली होती टपारिया?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : 'इंडियन मॅचमेकिंग' या शोची पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. सीमा टपारियाच्या 'इंडियन मॅचमेकिंग'(Indian Matchmaking) शोचा दुसरा सीझन बुधवारपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला आहे. परंतु मॅचमेकर सीमा टपारियाने प्रियांका चोप्रा(priyanka chopra) आणि निक जोनसच्या(nick jonas) जोडीबद्दल खळबळजनक टिप्पणी केली. त्यानंतर चाहते प्रचंड संतापले आहेत. सीमा टपारियाला सर्व जण 'सीमा आंटी' म्हणून ओळखतात, तिने प्रियांका-निकबद्दल वक्तव्य करून चाहत्यांचा रोष ओढवून घेतला आहे. ही जोडी जमत नसल्याचे ती म्हणाली होती.

सीमा टपारिया ही एक मॅचमेकर आहे. जी फक्त देशातीलच नाही, तर परदेशातही लग्ने जुळवण्याचे काम करते. ती पसंतीनुसार विवाहासाठी योग्य स्थळ आणते आणि जगभरात राहणाऱ्या भारतीयांची लग्न जुळवून देते. पण यावेळी तिने असे काही सांगितले आहे, जे ऐकल्यावर चाहते सीमा टपारियाविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस गेल्या चार वर्षांपासून आनंदी जीवन जगत आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. दोघांनीही नुकतेच आपल्या मुलीचे स्वागत केले. मात्र ही जोडी परफेक्ट मॅच नसल्याचे सीमा टपारियाला वाटते आहे. सीमा टपारियाने तिच्या एका क्लायंटच्या कुटुंबाशी केलेल्या संभाषणात प्रियांका चोप्रा- निक जोनस या जोडीचं उदाहरण दिलं. सीमा म्हणाली की, 'ही जोडी एक परफेक्ट मॅच आहे असे मला वाटत नाही. मला माफ करा, त्यांचा विवाह झाला आहे आणि माझे असे बोलणे बरोबर नाही. पण हे कपल एकमेकांसाठी परफेक्ट नाही. प्रियांकाच्या समोर निक खूप लहान दिसतो आणि ती वयाने खूप मोठी आहे.'

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या वयात १० वर्षांचे अंतर आहे. दोघांनी २०१८ साली लग्न केले आहे. अलीकडेच प्रियांका आणि निक यांनी सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनस आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Potato Wafers Recipe : वर्षभर खराब न होणारे बटाटा वेफर्स रेसिपी

Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : या ४ राशींवर बरसेल लक्ष्मीची कृपा, आरोग्याची काळजी घ्या

Today's Marathi News Live : नांदेडचा पारा पुन्हा वाढला, 41.02 कमाल तापमानाची नोंद

Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर येतेय! जबरदस्त फीचर्ससह किती मिळेल रेंज, जाणून घ्या

Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेचे 'बुरे दिन' सुरु; दोन दिवसांत 47000 कोटी रुपयांचं नुकसान, १३ टक्क्यांनी शेअरची घसरण

SCROLL FOR NEXT