30 एप्रिल रोजी कर्नाटकातील बेळगाव इथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला इलेक्शन कमिशन आणि प्रशासनाने काही अटी शर्तीनुसार परवानगी दिली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठा समाजाच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आलय मात्र सुरुवातीला पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नव्हती.
पंतप्रधान मोदींच्या सोमवार व मंगळवारी एकूण चार सभा
सोलापूर, पुणे, माढा व लातूरमध्ये पंतप्रधान घेणार सभा
सोलापुरात सोमवारी दुपारी २.१५ वाजता, तर पुण्यात सायंकाळी ६.३० वाजता सभा
माढा मतदारसंघात मंगळवारी सकाळी ११.४५ वाजता, तर पुण्यात दुपारी ३ वाजता मोदी घेणार सभा
भाईंदर पूर्वेच्या फाटक रोडवरील सालासर व्यावसायिक इमारतीच्या नाल्याच्या सफाईवेळी मृत अर्भक मिळून आले आहे. सफाई कामगारांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली नवघर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.त्यांनी अर्भक पुढील तपासासाठी शासकीय जोशी रुग्णालयात पाठवले असून ते नाल्यात कोणी टाकले याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांची तपासणी करत आरोपीचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे अर्भक नवजात असल्याची माहिती दिली आहे.
आज सगळ्या गोष्टी क्लिअर झालेलं आहे
उद्या विश्वजित कदम यांच्या पलूस मधे प्रचाराचा शुभारंभ करत आहेत
एका शेतकऱ्याचा मुलाला हरवण्यासाठी स्वतः मोदी येत आहेत याचा अभिमान आहे मला
मला विशाल पाटील किंवा संजय काका पाटील यांचं अजिबात आव्हान वाटत नाही
राहुल गांधी याची रॅली आणि शरद पवार याच्या सभा याच नियोजन सुरू आहे-
मी आज महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सर्वांच्या समोर उभा आहे
आज माझ्या पाठीमागे कोणीतरी उभा आहे अशा वावड्या उठवल्या जातात
सर्वच अंतकरणापासून स्वागत करतो
महाराष्ट्रात कुस्ती नावारूपास आली
महाराष्ट्रच वेगळं स्थान आहे खेळाला
कोल्हापूर कुस्तीचा माहेरघर झालं कुस्तीच,त्यानंतर पुण्याचं पण नाव झाला कुस्तीत
महाराष्ट्र सरकारने नेहमीच कुस्तीला प्रोत्साहन दिले
मामासाहेब मोहोळ याच कुस्तीत योगदान आहे
याचसोबत अनेक कर्तबगार कुस्तीगीर महाराष्ट्रात तयार झाले
कुस्ती मधे आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचं असेल तर मॅटवर खेळावे लागेल,
पालघर - सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू . पालघरच्या कीराट जवळील घटना . बोईसर च्या इको एडनशी पार्क येथील राहणारे मयत युवक . सूर्या नदीत अंघोळीसाठी गेले असता दोघांचा बुडून मृत्यू तर एकाला सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिकांना यश . स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल . बुडून मृत्यु झालेल्या युवकांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे .
राम मंदिर सोहळ्याला काँग्रेसने बहिष्कार घातला
काँग्रेसिच्या अंजेड्यात शिवसेना सहभागी
बाळासाहेब ठाकरेंना वेदना होत असतील
मोदींकडे गॅरेंटी आहे तर काँग्रेस कडे पेढ्यांचा पाऊस
धनुष्याला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत
पूर परिस्थितीमध्ये बाळासाहेबांना एकटे सोडून फाईव्ह स्टार मध्ये जाणारी लोकं पाहिलीत
तर कोल्हापुरात पूर आला तरी जीवाला जीव देणारी माणसे भेटली
नकली शिवसेना राहिलेली आहे हे बरोबर आहे कारण बाळासाहेब म्हणाले होते शिवसेना कधी काँग्रेस होऊ देणार नाही
आज त्यांचा मुलगा पंजाला मतदान करणार आहे या देशाचा आणि राज्याचे दुर्दैव आहे
बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील ज्या गोष्टीचा खेद व्हायला पाहिजे
उभाटाची शंभर टक्के काँग्रेस झालेली आहे
सन्मान कुस्तीचा कृतज्ञता सोहळा पैलवानांचा
महाराष्ट्रातील कुस्तीपटूचा पुण्यात मेळावा
शरद पवार याच्या उपस्थितीत काही वेळात होणार मेळावा
पुण्यात कात्रजमध्ये त्रिमूर्ती गार्डन येथे होणार पैलवानांचा कृतज्ञता सोहळा
पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने झालं निधन
वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोहनसिंग राजपाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधून झाले होते पुण्याचे महापौर
२०१० ते २०१२ या कालावधीत पुण्याचे महापौरपद भूषवले
गेले महिन्यांपासून आजारी होते
आज सायंकाळी होणार अंत्यविधी
मुंबई उपनगरातील बोरिवली येथील एका रुग्णालयाला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे.दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बोरिवली पश्चिमेकडील विन्स रुग्णालयाला आग लागली असून या आगीत चार जण जखमी.झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
प्रियंका गांधींनी लातूरमध्ये मराठीतून केली भाषणाला सुरुवात
गेल्या १० वर्षात देशात मोठी बेरोजगारी, महागाई वाढली
गॅस सिलिंडरचे भाव वाढले, निवडणूक आली की कमी केले जातात
शेतीच्या उपकरणांनावर जीएसटी लावली
सातारा जिल्हा देशाचा आगळा वेगळा जिल्हा आहे... ह्या जिल्ह्यातील लोकांणी स्वातंत्र्यासाठी लढा दिला . यशवंतराव चव्हाण यांना भारत भूषण दया अशी मागणी होतं आहे... आनंद आहे पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था आहे. चव्हाण यांचं स्मारक मुंबईत आहे संसदेतही चव्हाण यांचा फोटो आहे. अशा अनेक गोष्टी चव्हाण यांच्या कार्याची नोंद व्हावी यासाठी केल्या आहेत पण हा विषय निवडणुकीचा मुद्दा म्हणून आम्ही केला नाही
माढ्यात शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता
शरद पवारांचे कट्टर समर्थक पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची सकाळ पासून चर्चा .
कार्यकर्त्यांची बोलवली तातडीची बैठक.
बैठकीतील निर्णयाकडे लक्ष..
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेने कारवाई केल्यानंतर अभिजित पाटील गट अस्वस्थ.
नांदेड जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.आज कमाल तापमान 40 पार गेले आहे. शनिवारी कमाल तापमान 41 पूर्णांक 02 इतक्या तापमानाची नोंद झालीय. मागील चार दिवसा पासून नांदेडमध्ये उन्हाचा पारा वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेस रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. वाढत्या तापमानामुळे नागरिकांचा थंड पेयाकडे कल वाढलाय.दरम्यान उष्णतेमुळे नागरिक घराबाहेर जाण्याचं टाळत आहे. येत्या मे महिन्यात कमाल तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे
मुंबईतील पश्चिम उपनगर परिसरातील महिला पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी एम एच बी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महिला पत्रकार यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात चार अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल
महिला पत्रकाराचा आरोप आहे की काही दिवसांपूर्वी त्यांनी एक वृत्तपत्रांमध्ये (नवाकाळ) उत्तर मुंबई लोकसभा चे उमेदवार पियुष गोयल यांच्या संदर्भात बातमी केली होती.
त्या बातमीनंतर विरोधकांकडून पियुष गोयल यांचा निषेध व्यक्त करण्यात आला
भाजप समर्थक काही अज्ञात कार्यकर्त्यांनी महिला पत्रकाराच्या घरी जाऊन धमकावल्याचा आरोप महिला पत्रकाराने केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू
कोल्हापुरातील दोन्ही जागा संदर्भातली रणनीती आणि प्रचाराच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठक सुरू
कोल्हापुरातील पंचशील हॉटेल इथं बैठक सुरू
काँग्रेसने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं नाही हे दुर्दैवी आहे
कदाचित यामागे ठाकरे गटाचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही
ठाकरे गटांनेच दबाव टाकून एकही मुस्लिम उमेदवार देऊ दिले नाही असं आम्हाला वाटतं
कारण महाराष्ट्रात मुस्लिम समाज काँग्रेसचा खरा मतदार राहिला आहे
कोणीतरी नेता आहे ज्याच्या माहितीच्या आधारावर पक्ष श्रेष्ठींनी चुकीचा निर्णय घेतला असावा...
प्रश्न समाजाचा आहे
जो समाज काँग्रेसच्या पाठी महाराष्ट्रात उभा आहे... त्याला का डावललं जातंय? याचा शोध घेतला पाहिजे... त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय
मी आयुष्यभर काँग्रेसचा झेंडा घेऊन देशभर फिरलेला माणूस आहे...
आमचे नेते राहुल गांधींच्या हात मजबूत झाला पाहिजे यासाठी आम्ही लढलो आहोत आणि लढत आहोत
प्रश्न माझ्या नाही तर समाजाच्या नाराजीचा आहे...
मी सुद्धा खूप चिंतित आहे..
महाविकास आघाडीतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आज दुपारी 3.30 वाजता शिवसेना भवन येथे बैठक सुरू होणार आहे.दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. दक्षिण मध्यचे उमेदवार अनिल देसाई यांचा प्रचार स्वतः वर्षा गायकवाड करत होत्या परंतु आता वर्षा गायकवाड उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याने पुढील नियोजनासाठी या बैठकीत आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती.
कांदा निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, भूतान, बहरिन, मॉरिशस आणि श्रीलंका या 6 देशांमध्ये ही निर्यात होणार आहे. यामुळे सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मिळणार आहे, असंं ते म्हणाले.
बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 18 ते 25 एप्रिल दरम्यान 74 उमेदवारांनी 99 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 19 उमेदवारांचे 44 अर्ज बाद झाले आहेत. तर 55 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून सोमवारी 29 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतरच निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार असतील हे स्पष्ट होणार आहे. बीड मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार, असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे.
वर्षा गायकवाड नसीम खान यांच्या भेटीला गेल्या आहेत.
नसीम खान यांना उमेदवारी न दिल्याने नाराज
काँग्रेस पक्षाला अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी द्यायला हवी होती, अशी मागणी नसीम खान यांच्याकडून केली जात आहे. नसीम खान यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिलीय. सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलीय. केंद्राने ९९ हजार १५० मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलीय. काही दिवसापूर्वी भारत सरकारने २००० मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिलीय.
सोलापुरातील होम मैदानात पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. यासाठी एक भव्य शामियाना उभारला जातोय. एक लाख लोक या सभेत बसू शकतील अशी व्यवस्था भाजपकडून करण्यात आलीय. भर उन्हात सभा होत असल्याने फॅन, कुलर,थंडागर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलीय.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी पाठिंबा देणार की महायुतीला पाठिंबा देणार या संदर्भात ज्योती मेटे निर्णय घेणार आहेत. - दुपारी दीड वाजता पत्रकार परिषद घेऊन त्या आपली भूमिका मांडणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. येथील तिकीट वाटपा घोळ मिटवण्यासाठी ते बैठक घेत आहेत. गेल्या ४ तासांपासून ते एका खोलीत बंद दाराआड चर्चा घेत आहेत. कोल्हापुरातील पंचशील हॉटेलमधील एका खोलीत मुख्यमंत्री मुक्कामी आहेत, त्याच हॉटेलमध्ये ते बैठक घेत आहेत.
पर्यटन मंत्री गिरीश महाजन झाले आजोबा
मुलीला पुत्ररत्न झाल्याने गिरीश महाजन झाले आजोबा
मुलगी श्रेया हिस मुलगा झाल्याची महाजन यांनी दिली माहिती
काय म्हणाले गिरीश महाजन?
कुटुंबातील आपणा सर्वांना आम्ही आजी-आजोबा झाल्याची गोड बातमी देताना अत्यानंद होत आहे.
कन्या श्रेया आणि जावई अक्षय यांच्या संसारवेलीवर प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने गोंडस मुलाच्या रूपात सुंदर फुल उमलले ! कुटुंबातील या चिमुकल्याच्या सोबतीने लहानपण पुन्हा जिवंत करण्यास आतुर आहोत.
शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेले अजय बोरस्ते स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या भेटीला
- स्वामी शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभेमधून निवडणूक लढवत आहेत
- स्वामी शांतिगिरी महाराज हे महायुतीकडून इच्छुक आहेत
- नाशिकच्या सिडको परिसरामध्ये सिद्धिविनायक मंदिरात अजय बोरस्ते स्वामी शांतिगिरी महाराजांच्या भेटीसाठी पोहोचलेत
- मागील काळात स्वामी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली होती
- अजय बोरस्ते आणि स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या भेटीत नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं
आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना जामीन मंजूर मिळाला आहे.
मनी लॉन्ड्रिग केसमध्ये झाली होती खान यांना अटक
दिल्लीच्या राऊज एवेन्यू न्यायालयाने आमदार अमानतुल्ला खान यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला
अँटी करप्शन ब्यूरो (एसीबी) ने आप आमदार अमानतुल्लाह खान यांच्या विरोधात दिल्ली वक्फ बोर्डाच्या कामकाजात आर्थिक हेराफेरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता
या प्रकरणात इडीने अमानतुल्लाह विरोधात कारवाई करत त्यांना 18 एप्रिलला अटक केली होती
दिल्ली वक्फ बोर्ड नियुक्ती घोटाळ्यात PMLA कायद्यानुसार ही अटक करण्यात आली होती
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर
-शहरातील हॉटेल, लॉज याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची केली कोबिंग ऑपरेशन द्वारे तपासणी
- २९ तारखेला पुण्यातील रेस कोर्स या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा
-सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉजवर संशयस्पद राहणाऱ्या नागरिकांची पोलीस करत आहेत चौकशी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या अंबड टाकळी येथे घरगुती एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला आहे. यामध्ये घराची पूर्णतः पडझड झाली आहे. घरातील साहित्य देखील अस्ताव्यस्त अवस्थेत पडलं होतं. सुदैवाने जीवित हानी टळली. दरम्यान, काही दिवसापूर्वी असाच घरगुती सिलिंडरचा स्फोट होण्याचा प्रकार फुलंब्री तालुक्यातील निमखेडा गावात घडला होता, त्यावेळी मोठा भडका उडून एक गाडी पूर्णतः जळून खाक झाली होती.
- नाशिक लोकसभा निवडणुकीत आणखी एक नवा ट्विस्ट
- महंत अनिकेत शास्त्री नाशिक लोकसभेच्या रिंगणात
- भाजपकडून निवडणूक लढवत असल्याचा महंत अनिकेत शास्त्री यांचा दावा
- भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी अर्ज भरण्यास सांगितलं, महंत अनिकेत शास्त्री यांचा दावा
- महायुतीमधील जागेचा तिढा कायम असताना महंत अनिकेत शास्त्री यांच्या दाव्याने नवा पेच
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मनसे नेते अमित ठाकरे प्रथमच दिसणार एकत्र
पुण्यातील पंतप्रधानांच्या सभेत अमित ठाकरे एकाच व्यासपीठावर असणार
महायुतीच्या प्रचारासाठी २९ एप्रिलला पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा
पुणे, मावळ, बारामती व शिरूर लोकसभेसाठी प्रचार सभा
केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात कांदा निर्यातीची घोषणा केल्यानं नाशिक जिलह्यातील शेतकरी नाराज झाले होते. ३१मार्च २०२४ पर्यंत निर्यात बंदी कायम राहणार असल्याचे सरकारने पत्रक काढले. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला विरोध देखील केला. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली. मात्र दुसरीकडे लाल कांद्याची निर्यात बंदी उठवलेली नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
मुंबईत शनिवारी डीप क्लीन ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मुंबई महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांनी स्वतः मुंबईतील रस्त्यांची स्वच्छता केली. दरम्यान मुंबादेवी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर देखील यावेळी हातोडा चालवण्यात आला. तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई केली. कुलाबा, काळबादेवी लीलावती रुग्णालय वांद्रे तसेच प्रभात कॉलनी सांताक्रुझ, साकीनाका आणि पवई या ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं होत.
महादेव बुक ऑनलाईन बॅटिंग प्रकरणी अभिनेता साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज हा मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला
ऑनलाइन बेटिंग एप्लीकेशन्सचे प्रमोशन केल्याचा साहिल खानवर आरोप आहे
सत्र न्यायालयाने साहिल खानचा अटकपर्व जामीन अर्ज, फेटाळल्यानंतर साहिल खानने घेतली होती मुंबई उच्च न्यायालयात धाव
उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटल्यानंतर साहिल खानच्या अडचणीत वाढ
या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला आहे साहिल खानचा जबाब
साहिल खानसह अनेक चित्रपट अभिनेते आहेत आरोपी
मातोश्री'बाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरण मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी 9 मेपर्यंत तहकूब
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा दिला होता इशारा
अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत कौर राणा यांनी दिला होता इशारा
मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था न बिघडवण्याची समज देत CRPC कमल 192 अंतर्गत मुंबई पोलिसांनी बजावली होती नोटीस
मात्र तरीही याबद्दल मीडियात प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलिसांनी केला होता गुन्हा दाखल
आयपीसी कलम 153A, 34,37 सह मुंबई पोलीस कायदा 135 अंतर्गत दाखल गुन्हा आहे.
शरद पवार यांची रात्री पंढरपुरात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. त्यानंतर पवार पंढरपुरात मुक्कामी होती. आज सकाळी त्यांनी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.
पुणे जिल्ह्यातून एकूण 12 उमेदवारांचे अर्ज झाले बाद
पुण्यातून 1 तर शिरूरमधून 11 उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात
तर मावळमधून देखील एकूण 4 अर्ज बाद
पुण्यातून एकूण 42 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.