Ruchika Jadhav
बटाटा वेफर्स प्रत्येक व्यक्ती आवडीने खातात. उपवासाला देखील बटाटा वेफर्स खाल्ले जातात.
त्यामुळे आज उन्हाळ्यात बनवले जाणारे बटाटा वेफर्स घरच्याघरी कसे बनवतात ते जाणून घेऊ.
बटाटा वेफर्स बनवण्यासाठी आधी मोठ्या आकाराचे बटाटे एकसमान किसून घ्या.
त्यानंतर हे बटाटे रात्रभर मिठाच्या पाण्यात भीजत घाला.
भीजवलेले बटाटे सकाळी आर्धे कच्चे राहतील या तापमानावर शिजवून घ्या.
त्यानंतर त्यातील सर्व पाणी गाळून टाका. बटाट्याचे काप पाण्यातून वेगळे करा.
पुढे सर्व काप सुट्टे करून उन्हामध्ये चांगले वाळवून घ्या.
३ दिवस कडक उन्हात वाळल्यानंतर तयार झाले तुमचे बटाट वेफर्स.