Urfi Javed : 'या' नव्या लूकमध्ये उर्फी जावेद दिसतेय हॉट अण्ड बोल्ड, फोटो पाहून म्हणाल 'उफ्फ'!

सोशल मीडिया स्टार आणि फॅशनिस्टा उर्फी जावेद तिच्या ड्रेन्सिंग सेन्स आणि हटके स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.
Urfi Javed
Urfi Javed Saam Tv

Urfi Javed | मुंबई: सोशल मीडिया स्टार आणि फॅशनिस्टा उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या ड्रेन्सिंग सेन्स आणि हटके स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा उर्फी अतरंगी फॅशनमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या (fashion) फॅशन सेन्सची चाहत्यांना देखील फार उत्सुकता असते. आता नुकताच उर्फीच्या नवीन लूकने खळबळ उडवली आहे. नेहमीच नवनवीन प्रयोग करत प्रसिद्धीझोतात राहणाऱ्या उर्फीचा नवा बोल्ड लूक समोर आला आहे.

Urfi Javed
Jhalak Dikhhla Jaa 10 : मराठमोळी चंद्रा- चंद्रमुखीची जबरदस्त जुगलबंदी, माधुरी-अमृताचा व्हिडिओ व्हायरल

उर्फीचा सध्या नवीन लूक चर्चेत आहे. ज्यामध्ये उर्फी खूपच बोल्ड अंदाजात दिसते आहे. विशेष म्हणजे यावेळी उर्फीने फक्त स्लीव्ह्ज घातले आहेत.

Urfi Javed
Brahmastra: किंग खान शाहरुख खानला याआधी असं कधीच बघितलं नसेल, पाहा दमदार अवतार

फोटोमध्ये उर्फी खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. ज्यामध्ये उर्फीने ब्लॅक सिक्वेन्स हँड टॉप घातला आहे. उर्फीने हटके हेअरस्टाइल केली आहे. ज्यामुळे उर्फी आणखीच बोल्ड दिसते आहे. याशिवाय तिने कानामध्ये ब्लॅक इअरपीस घातले आहेत. फोटोमध्ये उर्फीने कॅमेऱ्याकडे बघून किलर पोज दिली आहे.

उर्फीची प्रत्येक स्टाइल आणि पोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. उर्फी तिच्या अजब स्टाइलमुळे कायमच चर्चेत राहते. यातील बहुतांश पोस्टमध्ये उर्फी चित्रविचित्र कपडे परिधान केलेले फोटो असतात. उर्फी तिच्या कामापेक्षा अतरंगी फॅशन सेन्समुळेच ओळखली जाते. यामध्ये ती कधी ज्यूट तर कधी गोणी, साखळी असे कपडे ती परिधान करते. अनेकदा अशा विचित्र फॅशनमुळे तिला ट्रोल व्हावे लागते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com