Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर येतेय! जबरदस्त फीचर्ससह किती मिळेल रेंज, जाणून घ्या

Bajaj Chetak Cheap Electric Scooter 2024: ओला इलेक्ट्रिक स्कूटरला टक्कर देण्यासाठी बजाज ऑटो आता आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर पुढील महिन्यात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर येतेय! जबरदस्त फीचर्ससह किती मिळेल रेंज, जाणून घ्या
Bajaj Chetak Cheap Electric Scooter 2024Saam Tv
Published On

Bajaj Chetak Cheap Electric Scooter 2024:

ओला इलेक्ट्रिक स्कूटरला टक्कर देण्यासाठी बजाज ऑटो आता आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर पुढील महिन्यात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी सध्या बाजारात उपलब्ध असेया चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचा स्वस्त व्हॅरिएंट सादर करणार आहे.

मात्र या स्वस्त मॉडेलमध्ये काही फीचर्सचा अभाव पाहायला मिळू शकतो. तसेच नवीन मॉडेलच्या डिझाइनमध्येही काही फरक पाहायला मिळू शकतो. कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर सादर करून बजाज ऑटोला बाजारात आपली पकड मजबूत करायची आहे.

Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर येतेय! जबरदस्त फीचर्ससह किती मिळेल रेंज, जाणून घ्या
EV Cars: पुणे - मुंबई- पुणे एका चार्जमध्ये गाठणार! Hyundai Exter Ev लवकरच होणार लॉन्च; मिळणार हे फीचर्स

किती असेल किंमत?

एका रिपोर्ट्सनुसार, बजाज ऑटोच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत सुमारे 1 लाख रुपये असू शकते. सध्या बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.23 लाख ते 1.47 लाख रुपयांपर्यंत आहे.

नवीन इलेक्ट्रिक चेतक TVS iQube, Ola S1X आणि नवीन Ather Rizzta शी स्पर्धा करेल. ओला इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वात स्वस्त स्कूटर 70 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर येतेय! जबरदस्त फीचर्ससह किती मिळेल रेंज, जाणून घ्या
Hyundai SUVs वर मिळत आहे 4 लाखांपर्यंत सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

किती मिळणार रेंज?

बजाज ऑटोच्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल अनेक बातम्या समोर येत आहेत. नवीन स्कूटरची किंमत कमी होऊ शकते, मात्र याची रेंज चांगली असेल, असं बोललं जात आहे. मात्र कंपनी यामध्ये किती रेंज ऑफर करेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले की, नवीन एंट्री-लेव्हल चेतक एक हब मोटर आणि लहान बॅटरी पॅकसह येऊ शकते. जेणेकरुन किमती नियंत्रणात राहतील, ज्यामुळे उत्पादकाला किंमत निश्चित करण्यात मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com