Hyundai Exter EV:
भारतात इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कार कंपन्याही नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवत आहेत. अशातच आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Hyundai Motor India आपल्या कॉम्पॅक्ट SUV Exter चे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या कारबद्दल बातम्या समोर येत आहेत. कंपनीने यामध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत, अशी माहिती मिळत आहे. उयाचबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
Hyundai Exter सध्या पेट्रोल आणि CNG पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. एका रिपोर्ट्सनुसार, Hyundai Exter EV मध्ये 25-30kWh बॅटरी पॅक मिळू शकतो. पूर्ण चार्ज केल्यावर ही कार सुमारे 300-350 किमीची रेंज देऊ शकते. म्हणजेच एकदा फुल चार्ज झाली तर तुम्ही पुणे, मुंबई आणि पुन्हा मुंबई ते पुणे असा प्रवास करू शकता. असं असलं तरी कंपनीने याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
Hyundai Exter EV च्या डिझाइनमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल होणार नाहीत. फक्त किरकोळ बदल यामध्ये ग्राहकांना दिसतील. याशिवाय फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये अनेक चांगले फीचर्स पाहायला मिळणार आहेत. एवढेच नाही तर सुरक्षेसाठी यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, एअरबॅग्ज, ईबीडी आणि ब्रेक असिस्टची सुविधा असेल.
नवीन Hyundai Exter EV भारतात या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केली जाऊ शकते. Exter EV ची भारतात किंमत सुमारे 10 लाख रुपये असू शकते. भारतात ही कारट टाटा पंच इलेक्ट्रिकशी स्पर्धा करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.