Toyota Fortuner Leader Price: स्पोर्टी लूक अन् दमदार फीचर्ससह टोयोटा फॉर्च्युनर 'लीडर' एडिशन लाँच; जाणून घ्या किंमत

Toyota Fortuner Leader Edition Launch Know Features in Marathi: एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वात जास्त टोयोटा फॉर्च्युनर ही कार सर्वाधिक वापरली जाते. ही कार आता नवीन एडिशनमध्ये सादर करण्यात आली आहे.
 Tata Fortuner Leader Edition Launched In India Know The Features, Price, Specification in Marathi
Tata Fortuner Leader Edition Launched In India Know The Features, Price, Specification in Marathigoogle

Toyota Fortuner Leader Launched

एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वात जास्त टोयोटा फॉर्च्युनर ही कार सर्वाधिक वापरली जाते. ही कार आता नवीन एडिशनमध्ये सादर करण्यात आली आहे. टोयोटा मोटरने भारतीय बाजारपेठेत २२ एप्रिलला ही कार लाँच केली आहे. या नवीन कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. त्यामुळे ही कार जुन्या मॉडेलपेक्षा वेगळी असणार आहे.

 Tata Fortuner Leader Edition Launched In India Know The Features, Price, Specification in Marathi
EPFO New Rule: EPFO चा नवीन नियम! आता काढू शकणार १ लाख रुपये; २७ कोटींहून अधिक खातेधारकांना फायदा

कंपनीने अद्याप टोयोटा फॉर्च्युनर लीडर या कारची किंमत जाहीर केलेली नाही. ज्या ग्राहकांना ही कार घ्यायची आहे ते लोक अधिकृत डिलरशिपद्वारे ही एसयूव्ही बुक करु शकतात. यासाठी ग्राहकांना ५०,००० बुकिंग किंमत द्यावी लागेल. टोयोटा फॉर्च्युनर सर्वात आधी २००९ मध्ये लाँच करण्यात आली होती. कंपनीच्या या कारला ग्राहकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता कंपनीने कारमध्ये काही बदल करुन कारचे नवीन एडिशन लाँच केले आहे.

फीचर्स (Toyota Fortuner's Features)

टोयोटा फॉर्च्युनरच्या लीडर एडिशनमध्ये कंपनीने ड्युअल- वन एक्स्टीरिअर पेंट, ब्लॅक- आउट अलॉय व्हील्स, वायरलेस चार्जर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, फ्रंट अँड रिअर बंपर स्पॉयरल दिले आहेत. कंपनीच्या या कारमध्ये ब्लॅक रुफसह व्हाइट, प्लॅटिनम पर्ल, सिलव्हर मेटॅलिक कलर ऑप्शन देण्यात आले आहे.

टोयोटा फॉर्च्युनर लीडर एडिशनला स्पोर्टी डिझाइन देण्यात आले आहे. कारमध्ये 2.8 लीटरचे डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6- स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले गेले आहे. हे इंजिन 240ps पॉवर आणि 420Nm टॉर्क जनरेट करते. तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरियंट 500Nm टॉर्क जनरेट करते.

 Tata Fortuner Leader Edition Launched In India Know The Features, Price, Specification in Marathi
Schengen Visa Rule: युरोपला फिरणे होणार आता सोपे; EU शेंजेन व्हिसाचे नियम बदलले; जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com