EPFO New Rule: EPFO चा नवीन नियम! आता काढू शकणार १ लाख रुपये; २७ कोटींहून अधिक खातेधारकांना फायदा

EPFO New Rule Of Cash Withdrawl: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओ अंतर्गत पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. यामुळे पीएफ खातेधारकांना दिलासा मिळाला आहे.
EPFO
EPFO Saam Tv

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओ अंतर्गत पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. यामुळे पीएफ खातेधारकांना दिलासा मिळाला आहे. पेन्शन बोर्डाने आता खातेधारकांना EPF काढण्याची मर्यादा वाढवली आहे. जर खातेधारकांना उपचारासाठी पैशाची गरज असेल तर ते १ लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात. आतापर्यंत पैसे काढण्याची मर्यादा ५० हजार रुपये होती. ही मर्यादा आता १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ईपीएफओने केलेला हा नवीन बदल १६ एप्रिल २०२४ पासून लागू करण्यात आला आहे, अहवालानुसार, नियमात बदल करण्यापूर्वी १० एप्रिलला कर्मचारी भविष्य निधी संघटनेने अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल केले होते. तुम्ही स्वतः च्या किंवा इतर सदस्याच्या अकाउंटमधून उपचारासाठी पैसे काढू शकतात. खातेधारकाला 68J अंतर्गत पैसे काढावे लागतील.

केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त (CPFC) कडून आदेश मिळताच EPFO ने गंभीर आजाराच्या बाबतीत पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. पीएफ खातेधारकाला गंभीर आजार किंवा प्रतिकूल आरोग्याच्या परिस्थितीत पीएफ खात्यातून पैसे काढण्याची सुविधा मिळते.

उपचारासाठी १ लाख रुपये काढण्यासाठी खातेधारकाला 68J अंतर्गत दावा करावा लागेल. खातेधारक फॉर्म 31 द्वारे पैसे काढण्याची सुविधा मिळते. यासाठी डॉक्टरांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र सादर करावे लागतील. १ लाख रुपये काढल्याचा दावा केल्यानंतर खातेदार स्वतः च्या किंवा संबंधित रुग्णालयाच्या खात्यात पैसे पाठवू शकतात.

EPFO
Petrol Diesel Rate 23nd April 2024: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या महाराष्ट्रातील इंधनाचा भाव

पैसे काढण्याची सोपी पद्धत

  • EPFO वेबसाइट www.epfindia.gov.in वर जा आणि लॉग इन करा.

  • ऑनलाइन सेवा पर्यायावर क्लिक करा आणि संबंधित फॉर्म भरा. 

  • आता तुम्हाला पीएफ खात्याचे शेवटचे ४ नंबर टाकून वेरिफाय करावे लागेल.

  • यानंतर Proceed For Online Claim वर क्लिक करा. फॉर्म 31 Yje.

  • यानंतर तुमच्या खात्याचा तपशील भरा आणि बँक पासबुक किंवा चेकची सॉफ्ट कॉपी अपलोड करा.

  • आता तुम्ही ओटीपी टाका आणि फॉर्म सबमिट करा.

EPFO
Schengen Visa Rule: युरोपला फिरणे होणार आता सोपे; EU शेंजेन व्हिसाचे नियम बदलले; जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com