Masti 4 vs 120 Bahadur Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Masti 4 vs 120 Bahadur Collection : काटे की टक्कर! रितेश देशमुख की फरहान अख्तर पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी? वाचा कलेक्शन

Masti 4 vs 120 Bahadur Box Office Collection Day 1 : 'मस्ती 4' आणि '120 बहादूर' चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले आहेत.

Shreya Maskar

'मस्ती 4' आणि '120 बहादूर' चित्रपट 21 नोव्हेंबरला रिलीज झाले आहेत.

'मस्ती 4' अन् '120 बहादूर' चित्रपट एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत.

'मस्ती 4' हा कॉमेडी चित्रपट आहे. तर '120 बहादूर'मधून एका सैनिकाची कथा सांगण्यात आली आहे.

21 नोव्हेंबर (शुक्रवारी) बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपट रिलीज झाले आहे. पहिला रितेश देशमुखचा 'मस्ती 4'आणि दुसरा फरहान अख्तरचा '120 बहादूर'. हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या प्रकाराचे आहेत. मात्र दोन्ही चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. ओपनिंग डे ला कोणत्या चित्रपटाने किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात. 'मस्ती 4' आणि '120 बहादूर' दोन्ही एकमेकांना तगडी टक्कर देताना दिसत आहेत.

'120 बहादूर' बॉक्स ऑफिस कलेक्शन

फरहान अख्तरचा '120 बहादूर' चित्रपटाने Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, पहिल्या दिवशी 2.35 रुपये कमावले आहेत. '120 बहादूर' मधून एका सैनिकाची कथा सांगण्यात आली आहे. चित्रपटात फरहान अख्तर मेजर शहीद सिंहच्या भूमिकेत आहे. राशी खन्नाने शहीद सिंहची पत्नी शगुन कंवरची भूमिका साकारली आहे.

'मस्ती 4' बॉक्स ऑफिस कलेक्शन

रितेश देशमुखच्या 'मस्ती 4' चित्रपटाने Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, 2.50 कोटी रुपये कमावले आहेत. 'मस्ती 4'मध्ये रितेश देशमुखसोबत विवेक ओबेरॉय, अरशद वारसी, आफताब शिवदासानी, तुषार कपूर, नरगिस फाखरी, एलनाज नौरोजी , श्रेया शर्मा हे कलाकार झळकले आहेत. 'मस्ती 4' चित्रपट मिलाप झावेरी यांनी दिग्दर्शित केला आहे.

'मस्ती 4' हा चित्रपट कॉमेडी ड्रामा आहे. 'मस्ती 4' हा 'मस्ती' फ्रेंचायझीचा चौथा भाग आहे. वीकेंडला हे दोन्ही चित्रपट किती कोटींची कमाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे 2' चित्रपटाने 2.25 कोटी कमावले आहेत. आतापर्यंत चित्रपटाची एकूण कमाई 53.50 रुपये झाली आहे. 'दे दे प्यार दे 2' सिनेमा 14 नोव्हेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT