Onkar Bhojane  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maharashtrachi Hasya Jatra: मला वाटलं तर मी येतो नायतर येत पण नाय...,'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजनेचे कमबॅक

Onkar Bhojane Comeback In Maharashtrachi Hasya Jatra: आता पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना हसवण्यासाठी ओंकार भोजने सज्ज झाला आहे.

Priya More

Onkar Bhojane:

आपल्या दमदार अभिनयाने आणि हावभावाने प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा लोकप्रिय विनोदवीर ओंकार भोजनेने (Onkar Bhojane) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasya Jatra) या कार्यक्रमातून अचानक एक्झिट घेतल्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

कारण न सांगताच ओंकार या कार्यक्रमातून बाहेर पडला होता. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले होते. पण आता ओंकारने त्याच्या चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. ओंकारने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये कमबॅक केले आहे. आता पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना हसवण्यासाठी ओंकार भोजने सज्ज झाला आहे.

नुकताच सोनी मराठीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ओंकार भोजने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. ओंकारला या कार्यक्रमात पाहून त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये ओंकार सर्वांना हसवणार आहे. सोनी मराठीने हा प्रोमो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'हास्यजत्रेत पुन्हा एकदा ओंकार भोजनेची धमाल… पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या! - दिवाळी स्पेशल. शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.', असे लिहिले आहे.

सोनी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये ओंकार भोजने म्हणतो की 'मला वाटलं तर मी येतो नायतर येत पण नाय..., कधी नव्हे एकदा आलोय तर सगळंच माझ्यावर देऊ नका.' असा डायलॉग बोलताना दिसतोय. ओंकार आल्यामुळे हास्यजत्रेतील इतर कलाकार देखील आनंदीत झाले आहेत. ओंकारच्या चाहत्यांनी या प्रोमो व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.

ओंकारच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये लिहिले की, 'वा वा लयभारी आता खरी मजा येणार. खूपच आनंद झाला बघून' तर दुसऱ्याने कमेंट्समध्ये असे लिहिले आहे की, 'आनंद दिवाळीचा द्विगुणित झाला.. आमचा भोजने पुन्हा हास्यजत्रेत परत आला.' तर आणखी एकाने कमेंट्समध्ये असे लिहिले की, 'आला रे आला ओंकार आला, अभी आयेगा मजा, आता हास्यजत्रा पुन्हा बघण्यास सुरू करणार, तुला आम्ही खूप मीस केलं, अब आयेगा मजा...', अशा प्रकारच्या कमेंट्स ओंकारच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

SCROLL FOR NEXT