Marathi Serial's Ashadhi Ekadashi Special Episode Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ekadashi Special Episode: मराठी मालिकांमध्ये रंगणार आषाढी एकादशी विशेष भाग; कलाकार घालणार विठूरायाला साकडं

Rang Maza Vegala Serial Ekadashi Latest Ep: मालिकेत नेहमीच सणावाराला नवीन काहीतरी पाहायला मिळतं. आषाढी एकादशीनिमित्त देखील प्रेक्षकांना मालिकांमध्ये विशेष भाग पाहायला मिळणार आहे.

Chetan Bodke

Marathi Serial's Ashadhi Ekadashi Special Episode: मराठी मालिका प्रेक्षकांच्या मनात नेहमीच घर करत असतात. फार पूर्वीपासून मराठी मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.महाराष्ट्रात आजही रात्री ६ वाजल्यापासूनच मालिका बघायला संपूर्ण कुटुंब एक येतं.मालिकेत नेहमीच सणावाराला नवीन काहीतरी पाहायला मिळतं. आषाढी एकादशीनिमित्त देखील प्रेक्षकांना मालिकांमध्ये विशेष भाग पाहायला मिळणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील अनेक भक्त पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला जातात. मराठी मालिकांमध्येही आषाढी एकादशी निमित्त प्रेश्रकांना विठूरायाचं दर्शन घडतं.स्टार वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे,रंग माझा वेगळा,मन धागा धागा जोडते नवा,ठरलं तर मग या मालिका नेहमीच टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर असतात. आषाढी एकादशीनिमित्त या मालिकांमध्ये नवीन पर्व सुरू होणार आहे.

'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth) मालिकेत आषाढी एकादशीनिमित्त स्वामी समर्थांच्या रुपात विठू माऊली दर्शन देणार आहे. तर 'योगयोगेश्वर जयशंकर' (Yogyogeshwar Jai Shankar) मालिकेत आषाढी एकादशीनिमित्त विशेष भाग पाहायला मिळणार आहे.

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेत सुरवातीपासूनच दिपा ही विठूरायाची भक्त असल्याचे दाखवण्यात आले आहे. काही भागांमध्ये दिपा आणि कार्तिकमध्ये बरेच गैरसमज झाले आहेत. तर आता आषाढी एकादशीच्या भागात विठुरायाच्या साक्षीने दिपा-कार्तिकमधील गैरसमज दुर होणार आहेत.

'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) मालिकेत मंजुळा आणि मल्हारच नात रंजक वळणावर आहे. मलिकेत स्वराज आई-बाबांची भेट व्हावी असं साकडं विठूरायाला घालतो. तर विठ्ठलाच्या मंदिरात पोहोचलेल्या मंजुळा आणि मल्हार एकमेकांना भेटणार आहेत. मंजुळाला पाहून मल्हारला धक्का बसणार आहे.आता मालिकेत मल्हार आणि मंजुळाच्या नात्यात काय वळण येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava) या मालिकेत आनंदीने स्पर्धेसाठी बनवलेली साडी विठूरायाच्या चरणी ठेवते. आणि देवाकडे प्रार्थना करते. आनंदीचे डोळे बंद असतानाच अंशुमन साडी घेऊन गायब होतो. आता आनंदीला विठ्ठलाच्या कृपेने साडी परत कशी मिळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pro Govinda Season: आजपासून ३ दिवस रंगणार प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामना; १६ गोविंदा पथकं एकमेकांसमोर उभी ठाकणार

Maharashtra Nurses Strike : आरोग्य यंत्रणा ठप्प होणार? नर्सचा संपाचा इशारा | VIDEO

Ambarnath : भरधाव स्कुल व्हॅनमधून विद्यार्थी पडले खाली; अंबरनाथमधील धक्कादायक घटना, घटना सीसीटीव्हीत कैद

'भोजपुरीमध्ये बोलून दाखव...' उत्तर प्रदेशमध्ये मराठी तरुणाला दमदाटी|VIDEO

Maharashtra Live News Update : बांबूच्या जोडीतून गर्भवती महिलेची सात किलोमीटरची पायपीट....

SCROLL FOR NEXT