72 Hoorain Trailer: सेन्सॉर बोर्डानं रिजेक्ट केल्यानंतरही ‘७२ हूरें’ चा ट्रेलर लाँच, थरकाप उडवणारा ट्रेलर पाहिलात का?

Latest Bollywood Film: ‘द केरला स्टोरी’नंतर आता आणखी एका चित्रपटाची चर्चा होत आहे.
72 Hoorain Trailer
72 Hoorain TrailerSaam Tv
Published On

72 Hoorain Trailer Shared Social Media: ‘द केरला स्टोरी’नंतर आता आणखी एका चित्रपटाची चर्चा होत आहे. धर्मांतर, दहशतवाद आणि निष्पाप लोकांचे ब्रेनवॉशिंग या पार्श्वभूमीवर बनवण्यात आलेल्या ‘७२ हूरें’ (72 Hoorain)चा ट्रेलर सेन्सॉर बोर्डाने (CBFC) नाकारला होता, त्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवर (72 Hoorain Movie Trailer) प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या तुफान चर्चा सुरू आहे.

72 Hoorain Trailer
Nawazuddin Praise Kangana: कंगना रनौतमध्ये बोलण्याची हिंमत आहे; नवाजुद्दीन सिद्दीकीनं केलं तोंडभरून कौतुक

चित्रपटाचे दिग्दर्शन संजय पूरण सिंह चौहान यांनी केले असून अशोक पंडित यांनी निर्मिती केली आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचा ट्रेलर नाकारल्याने या चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा सुरू आहे.

सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचा ट्रेलर नाकारल्याने निर्मातेही नाराज झाले आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रमाणपत्र नाकारण्याच्या निर्णयाची जबाबदारी सर्व सेन्सॉर अधिकाऱ्यांची आहे, असे मत चित्रपटाचे निर्माते अशोक पंडित यांचं आहे.

संजय पूरण सिंह चौहान दिग्दर्शित चित्रपटाचा ट्रेलर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये मानव निर्मित बॉम्ब कसा बनवायचा याची कथा दाखवण्यात आली आहे. स्वर्गाचा मार्ग दाखवण्याच्या नावाखाली कशापद्धतीने ब्रेनवॉशिंग केलं जात आहे हे ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या हा ट्रेलर तुफान चर्चेत आला असून अनेक युजर्सने ट्रेलरला शेअर केले आहे.

72 Hoorain Trailer
KKK13 Sheezan Khan Evicted: ‘खतरों के खिलाडी'मध्ये १३ पैकी ५ स्पर्धक घरी, डेझी शाहनंतर आणखी एकजण बाहेर

‘७२ हूरें’ हा चित्रपट येत्या ७ जुलै २०२३ रोजी १० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात आमिर बशीर आणि पवन मल्होत्रा ​​या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com