Actress  Bungalow Collapsed
Actress Bungalow CollapsedSaam TV

Actress Bungalow Collapsed: मुंबईत पावसाचं थैमान; धोधो पावसाने अभिनेत्रीचा बंगलाच कोसळला

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ठाण्यातील (Thane) मुंब्रा रेतीबंदर या ठिकाणी ही घटना
Published on

Thane News: मुंबईत आज सर्वत्र मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. जागोजागी पाणी साचले आहे. तर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अशात दिवंगत अभिनेत्री नूतन यांच्या बंगल्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडलीये. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Latest Thane News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ठाण्यातील (Thane) मुंब्रा रेतीबंदर या ठिकाणी ही घटना घडली आहे. सदर परिसरात दिवंगत अभिनेत्री नुतन यांचा बंगला आहे. हा बंगला फार जूना असल्याने आता तो बराचरसा जिर्न झालाय. त्यामुळे आज कोसळत असलेल्या पावसात या बंगल्याचा काही भाग खाली कोसळला आहे.

Actress  Bungalow Collapsed
Mumbai Local Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत, बदलापूरमधून धीम्या गतीने लोकल सुरु

सदर घटना २७ जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारस घडली आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्ष एका वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी या भागाची पाहणी केली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला याची माहिती दिली आहे.

नूतन यांची अनेक गाणी आणि चित्रपट (Movie) चाहते आजही आवडीने पाहतात. एवढ्या जुण्या काळातील हा बंगला असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून तो पडीक होता. मात्र तो नूतन यांचा बंगला आहे त्यामुळे नागरिकांसाठी तो आकर्षणाचा केंद्र आहे. त्यामुळे हा बंगला पाडण्यात आला नव्हता. मात्र आज पावसाचा जोर असल्याने त्यांच्या बंगल्याचा बराच मोठा भाग कोसळल्याची घटना घडली आहे.

Actress  Bungalow Collapsed
Thane News | वंदे भारत गाडीचं स्वागत करताना भाजप , ठाकरेगटा आमनेसामने !

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com