'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत एका आनंदाच्या क्षणाचे रूपांतर एका अनपेक्षित आणि धक्कादायक घटनेत झाले आहे. मिठूच्या सरप्राइझची वाट पाहत असलेल्या पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात अचानक एक मोठा धक्का बसला आहे. तेजा आणि हर्षितसाठी खास सरप्राईज प्लान करणारी मिठू काही वेळातच घरात गंभीर अवस्थेत आढळले. तेजा मिठूला हाक मारत आत जाते. तेव्हा समोरचे दृश्य पाहून हादरते.
मिठूवर रूमध्ये मोठा हल्ला होतो. मिठूवर घडलेल्या प्रसंगामुळे पिंगा गर्ल्स हादरल्या आहेत. संपूर्ण घर अस्वस्थ झाले आहे. संपूर्ण घटनेमागील सत्य शोधायला सुरूवात झाली आहे. नेमका हा हल्ला कसा झाला आणि कोणी केला हे शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे वल्लरीसाठी आता नवी परीक्षा उभी राहिली आहे. सर्वात स्थिरबुद्धीची आणि जबाबदार असलेल्या वल्लरीला आता मैत्रिणींना सांभाळावं लागणार आहे. संपूर्ण ग्रुप भावनिक तणावात असताना वल्लरी त्यांना कसा आधार देणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
मिठूवर झालेल्या हल्यामुळे पिंगा गर्ल्समधील नातेसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तुटलेल्या घराला सावरण्याचे काम वल्लरी आणि प्रेरणा करत आहेत. श्वेता आणि तेजा मानसिकदृष्ट्या खचल्या असून प्रेरणा आणि वल्लरी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्वांमुळे पिंगा गर्ल्सची मैत्री अजून घट्ट होईल का? की त्यांच्या नात्यात दुरावा वाढेल? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.
घडलेल्या घटनेचा पोलीस तपास सुरू होणार असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत अनेक गोष्टीसमोर येणार आहेत. वल्लरी आणि तिच्या मैत्रिणींनी आता एकत्र येऊन या घटनेचं सत्य शोधणार आहेत. 'पिंगा गं पोरी पिंगा' ही मालिका कलर्स मराठीवर संध्याकाळी ७.३० वाजता पाहायला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.