Latest Marathi Serial Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Premachi Goshta : प्रेमाच्या गोष्टीमध्ये नवा ट्विस्ट; माधवीच्या अपघाताला कोण कारणीभूत?

Premachi Goshta Serial : 'प्रेमाची गोष्ट' या लोकप्रिय मालिकेत नवा ट्विस्ट. मिहिर मिहिकाच्या लग्नामध्ये अनखी एक विघ्न सावनीच्या रुपात आलयं. नविन प्रोमोमध्ये मुक्ताच्या आईचा एका गाडीमुळे बाजारात अपघात होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'प्रेमाची गोष्ट' ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मागील काही भागांमध्ये सागर - मुक्ताला एकमेकांबद्दल वाटणारे प्रेम कोणत्या न कोणत्या मार्गने व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांनी मिहिर आणि मिहिकाला सर्व कुटुंबियांसमोर अखेर प्रेम व्यक्त करण्यास भाग पाडले. त्यानंतर मिहिर आणि मिहिका या दोघांच्या साखरपुडा करण्यासाठी कोळी आणि गोखले कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले आहे. मात्र कार्यक्रमाला सावनीमुळे अडथळा निर्मान झाला.

कालच्या एपिसोडमध्ये, मिहिर-मिहिकाच्या साखरपुड्याची लगबग सुरु होती. घरातील वातावरण आनंदी असताना त्यामध्ये मिठाचा खडा पडतो तशी सावनीची एन्ट्री झाली. सानवीला पाहाताच मुकताच्या आईने तिला कार्यक्रमातून जाण्यास सांगितले. त्यानंतर तिने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. ती मिहिरची सख्खी बहिण असल्याचे तिने सर्वांसमोर सांगितले. या भागामुळे प्रेक्षकांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सत्य कळल्यानंतर मुकताच्या आईने साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सर्वजण त्यांची समजूत काढताना दिसले. मात्र, त्यांनी केनाचे ऐकले नाही. त्यानंतर मुक्ता आणि सागरच्या लग्नामध्ये जेव्हा सर्वांना कळलं की सागला ११ वर्षांचा मुलगा असल्याचे कळून सुद्धा मुक्ताचे लग्न सागरसोबत करून चुक केल्याचे तिने सांगितले. मात्र, दुसरीकडे जेव्हा मिहिर या सर्व घटनेमुळे दुखी असतो त्याची समजूत काढायला जाते आणि सावनीला माफ करण्याचा सल्ला देते. पण मिहिर त्याला आणि सागरला झालेल्या त्रासामुळे तीला कधीच माफ करू सकत नाही असं बोलतो.

नव्या प्रोमोमधील नवा ट्विस्ट

आजच्या भागात मुक्ताची आई जेव्हा बाजारात जाते तेव्हा तीचा एका कारमुळे आपधात होतो. तिला पाहाण्यासाठी लोकांचा घोळका होतो तेव्हा तिथे सागर येऊन पोहचते. जेव्हा तो मुक्ताच्या आईला बघतो तोव्हा त्याला मोठा धक्का बसतो. ज्या गाडीमुळे आपधात झाला त्या गाडीची नंबर प्लेट पाहून सागरला धक्का बसतो. आता ही गाडी नेकं कोणाची असा प्रश्न पडतो. सुड उगवण्यासाठी मिहिरनी असं केलं असू शक्त का किंवा मुक्ताला धडा शिकवण्यासठी हा सावनीचा नवा प्लॅन तर नाही ना असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 'हे' नॅचरल फॅट बर्नर पदार्थ रोज खा!

Congress: 'बिडी-बिहार'च्या पोस्टनं राजकारण तापलं; वादानंतर काँग्रेसचा माफीनामा

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

SCROLL FOR NEXT