Lai Avadtes Tu Mala SAAM TV
मनोरंजन बातम्या

Lai Avadtes Tu Mala : 'लय आवडतेस तू मला' मालिकेत नव्या पात्रांची एन्ट्री, सरकार-सानिकाच्या आयुष्यात येणार वादळ

Lai Avadtes Tu Mala Update : 'लय आवडतेस तू मला' मालिकेत नव्या पात्रांची एन्ट्री झाली आहे. सरकार-सानिकाच्या आयुष्यात कोणते नवीन वादळ येणार जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'लय आवडतेस तू मला' (Lai Avadtes Tu Mala) मालिकेत आता नवीन वळण पाहायला मिळणार आहे. सरकार आणि सानिकाच्या आयुष्यात नवा ट्विस्ट येणार आहे. सरकार आणि सानिकाच्या प्रेमाच्या गोष्टीने प्रेक्षकांना बांधून ठेवले आहे. या मालिके आता नवीन पात्रांची एन्ट्री होणार आहे. यामुळे कथेला नवे वळण मिळणार आहे. मालिकेत अम्मा आणि राणीच्या येण्याने सरकार आणि सानिकाच्या आयुष्यात नवीन घडामोडी घडणार आहेत.

'लय आवडतेस तू मला' मालिकेतील पहिले नवीन पात्र म्हणजे 'अम्मा'. ही भूमिका अभिनेत्री संजीवनी पाटील साकारत आहे. सरकार आणि सानिका हनिमूनला जाताना अचानक एका अडचणीत अडकतात. ते एका सुनसान ठिकाणी मदतीच्या शोधात असतात. अशा वेळी अम्माची एन्ट्री होते. अम्मा त्यांना मदत करते. मात्र, अम्माची ही मदत त्यांच्या सुखी संसारावर कुठल्या वादळाची चाहूल देणार आहे का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

'लय आवडतेस तू मला' मालिकेतील दुसरे नवीन पात्र म्हणजे 'राणी'! ही राणी म्हणजे एक खट्याळ, निरागस आणि चुणचुणीत मुलगी आहे. तिच्या दोन वेण्या, रंगीबेरंगी गॉगल्स, हातात खेळण्याचं घड्याळ, स्कर्ट घातलेला मस्त स्टायलिश लूक तिने केला आहे. तिच्या चेहऱ्यावर निरागस हास्य दिसत आहे. सानिकाच्या आयुष्यात राणीचं आगमन सुखद असणार का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

'लय आवडतेस तू मला' मालिकेत अम्मा-राणीची सरप्राईज एन्ट्री झाल्यामुळे मालिका पाहायला अजून मजा येणार आहे. 'लय आवडतेस तू मला' मालिका सोमवार ते शनिवार 9.30 वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT