Lai Avadtes Tu Mala : सानिकाच्या नाराजीचं खरं कारण सरकारला समजणार, मालिकेत पुढे काय घडणार?

Lai Avadtes Tu Mala Update : 'लय आवडतेस तू मला' मालिकेत सध्या सानिका आणि सरकारमध्ये दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. सरकार हा दुरावा कसा मिटवणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
Lai Avadtes Tu Mala Update
Lai Avadtes Tu Mala SAAM TV
Published On

'लय आवडतेस तू मला' (Lai Avadtes Tu Mala) मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. सध्या 'लय आवडतेस तू मला' मालिकेत धुमाळ कुटुंबात समाधानाचे क्षण आले आहेत. कमलच्या खऱ्या किडनॅपरला पकडण्यासाठी सईने दिलेल्या मदतीमुळे सगळ्यांचा तिच्या प्रति असलेला रोष कमी होतो आहे आणि सर्वजण तिच्या या मदतीमुळे खुश आहेत. सरकार आप्पांसाठी घेतलेल्या प्लॉटवर घर बांधण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण करायचं ठरवतो.

दरम्यान, सानिका एका अडचणीत आलेल्या जोडप्याचं भांडण समजुतीने सोडवते तर आप्पा सरकारकडून वचन घेतात की तो कधीच भांडण किंवा मारामारी करणार नाही. पण सरकारसाठी खरी अडचण तर सानिकाच्या नाराजीमुळेच निर्माण होते. सरकारला सानिकाच्या रागाचं कारण कळत नाही. त्याच्याकडून काही चूक घडली आहे का? हे सुद्धा सानिका सांगायला तयार नाहीये. बायकोच्या मनातलं नवऱ्याने कसं ओळखावं हे कधी नं सुटणारं कोडं आहे आणि त्यामुळे सरकार गोंधळलेला पाहायला मिळत आहे.

सरकार सानिकाला मनवण्यासाठी अनेक प्रयत्न करतो पण ते यशस्वी ठरतात का? सानिका ठामपणे म्हणते "जोवर तुला तुझी चूक समजत नाही, तोवर मी बोलणार नाही." यामुळे सरकार अधिकच गोंधळतो आणि चिडचिड करतो. आता सरकार आणि सानिकामधील अबोला कधी संपणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. शेवटी जेव्हा सरकारला सानिकाच्या नाराजीचं खरे कारण कळते. तेव्हा सरकार काय करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. सरकार सानिकाला सुंदर सरप्राइज देणार आहे.

सरकार आणि आप्पाच्या नात्यातील नवीन आव्हाने सानिका आणि सरकारच्या प्रेमाची नवीन परीक्षा घेणार आहेत. याला सरकार आणि सानिका कसे सामोरे जाणार हे पाहा. 'लय आवडतेस तू मला' मालिका कलर्स मराठीवर रात्री 9.30 वाजता पाहायला मिळते.

Lai Avadtes Tu Mala Update
Kesari Chapter 2 :'केसरी २'च्या टीमनं दिली सुवर्ण मंदिराला भेट; अक्षय-माधवन अन् अनन्यानं घेतलं दर्शन, पाहा Photo

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com