Ashok Ma. Ma SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ashok Ma. Ma : 'अशोक मा.मा.' मालिकेत नवा ट्विस्ट; भैरवी बनणार मामांची नवीन बॉस, पुढे काय घडणार?

Ashok Ma. Ma Serial Update : 'अशोक मा.मा.' मालिकेत आता रंजक वळण पाहायला मिळणार आहे. भैरवी मामांची नवीन बॉस बनणार आहे. मालिकेत पुढे काय होणार, वाचा.

Shreya Maskar

'अशोक मा.मा.' (Ashok Mama) मालिकेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 'अशोक मा.मा.' मालिकेत भैरवी आता अशोक मामांची 'बॉस' होणार आहे. यामुळे मालिकेत अनेक बदल घडताना दिसणार आहेत. अशोक मामा आणि भैरवीत मैत्री होणार की काय? अशी चिन्ह मालिकेत पाहायला मिळत आहेत. भैरवी 'बाबा' अशी हाक मारत अशोक मामांचे स्वागत करणार आहे. मालिकेत पुढे काय घडणार जाणून घेऊयात.

भैरवीला तिच्या ऑफिसमधून पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे आता अशोक मामा तिच्या हाताखाली काम करणार आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष घराबाहेर असला तरी परिणाम घरात दिसणार आहेत. अशोक मामा हे आतापर्यंत एक समजूतदार, शांत णि प्रसंगी घरातल्या संघर्षातून मध्यस्थी करणारे व्यक्तिमत्व आहे. मात्र आता त्यांना भैरवीच्या हाताखाली काम करावे लागणार आहे त्यामुळे मालिका अजूनच रंजक होणार आहे. अशोक मामा आणि भैरवीच्या एकत्र कामातून निर्माण होणारे वैचारिक वर्चस्व हे मालिकेचे सध्या केंद्रबिंदू ठरणार आहे.

घरातील ताणतणाव अधिकच गडद होणार आहे. घरात एकीकडे राधाचे हरवलेले मंगळसूत्र, मुलांनी घातलेला 'घाबरवण्याचा प्लान', अनिशचा वाढता राग आणि किश्या-राधा-भैरवी यांच्यात वाढत चाललेला ताण या सगळ्यामुळे मालिका आता रंजक वळण घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर भैरवीचं बॉसपद अधिकच वादग्रस्त ठरू शकते. एकीकडे भैरवीचा प्रोफेशनलपणा आणि आत्मविश्वास तर दुसरीकडे मामांचं पारंपरिक मूल्य आणि आदरपूर्वक वागणं या दोघांत संघर्ष होणार की समन्वय? हे येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

अशोक मामा आणि भैरवीच्या नात्याचा थेट परिणाम घरातील इतर सदस्यांवर होणार आहे. पण हे सगळे बघणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा टप्पा असणार आहे. बॉस ही पदवी भैरवीसाठी कौटुंबिक पाठिंबा देणारी ठरेल की नवा संघर्ष उभा करेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'अशोक मा.मा.' मालिका कलर्स मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT