Ashok Saraf News : “शरद पवार माझे आवडते नेते, त्यांनी माझं काम तीन मिनिटांत केलं”; पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ यांनी सांगितला 'तो' किस्सा
Ashok Saraf On Sharad Pawar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ashok Saraf News : “शरद पवार माझे आवडते नेते, त्यांनी माझं काम तीन मिनिटांत केलं”; पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ यांनी सांगितला 'तो' किस्सा

Chetan Bodke

अभिनेते अशोक सराफ यांना आज मराठी नाट्यपरिषदेकडून पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार नेते शरद पवारांच्या हस्ते अभिनेते अशोक पवार यांच्यासह अभिनेत्री रोहिनी हट्टंगडी यांनाही देण्यात आला आहे. नाटककार गोविंद बल्लाळ देवल स्मृती दिनानिमित्त हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ यांनी शरद पवार यांचे कौतुक केले आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेते अशोक सराफ काय म्हणाले ?

"आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. पुरस्कार मिळाल्यानंतरचा आनंद शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. गेल्या काही दिवसांपासून मला सलग पुरस्कार मिळत आहेत. हा सलग मिळालेला चौथा पुरस्कार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेतून मला पुरस्कार मिळणं फार महत्वाची गोष्ट आहे. हा पुरस्कार मला आदरणीय शरद पवारांच्या हस्ते मिळाला आहे. माझ्या मनामध्ये कायमच शरद पवार यांच्याविषयी भावना आहेत. माझे आवडते नेते म्हणजे शरद पवार आहेत."

"या सोहळ्यानिमित्त तुम्हाला मी एक किस्सा सांगतो. शरद पवारांकडे माझं एक काम होतं. त्यांनी ते काम मोजून ३ मिनिटांत केलं होतं. त्यांनी करुन दिलेलं काम खरंच अवघ्या काही मिनिटांत झालं. त्यांच्या कामाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्यांच्या डोक्यात कोणतीही गोष्ट फार पटकन लक्षात राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी भेटलेली व्यक्ती नेहमीच त्यांच्या लक्षात राहते."

"फक्त लक्षातच राहत नाही तर त्यांची ओळख अगदी नावासकट लक्षात असते. खरंतर त्यांना मी पर्सनली केव्हाच भेटलो नाही. पण जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी एक स्मित हास्य दिले. अशा चातुर्य आणि चाणक्ष व्यक्तीच्या हस्ते मला आजचा अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पुरस्कार मिळाला आहे, ही बाब फार महत्वाची आहे. "

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Lanke: दूध,कांदा दरवाढीसाठी मविआचं आंदोलन; लंकेंचे कार्यकर्ते आणि पोलिस भिडले!

Marathi Live News Updates : रविंद्र वायकरांच्या निकालाचा वाद आता हायकोर्टात

VIDEO: नवी मुंबईत फ्लेमिंगोंच्या मृत्युला बांधकाम जबाबदार? Chetan Tupe नेमकं काय म्हणाले?

Dharashiv News : रानडुकराची तस्करीच्या आरोपात तरुणाला कोंडून ठेवत मारहाण; तरुण गंभीर जखमी

Pune Crime: पुण्यात कोयत्याची दहशत कायम, डॉक्टरने तरुणावर केला जीवघेणा हल्ला; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT