Shivrayancha Chava Film Create History In Marathi Cinema Instagram
मनोरंजन बातम्या

Shivrayancha Chava Film Create History In Marathi Cinema: दिग्पाल लांजेकरांच्या ‘शिवरायांचा छावा’ने प्रदर्शनाआधीच रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला मराठी चित्रपट

Marathi Cinema Create History: दिग्पाल लांजेकार दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ने प्रदर्शनाआधीच जागतिक स्तरावर एक विक्रम मोडीत काढला आहे.

Chetan Bodke

Shivrayancha Chava Film Create History In Marathi Cinema

दिग्पाल लांजेकार दिग्दर्शित ‘शिवराज अष्टक’ने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ‘शिवराज अष्टक’मधील पाचही चित्रपटांना भरघोस प्रतिसाद मिळाला. गेल्या काही दिवसांपूर्वी त्या पुष्पातील पाचवे पुष्प प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ‘सुभेदार’ चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या भेटीला सहावे पुष्प अर्थात ‘शिवरायांचा छावा’ भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी सहाव्या पुष्पाची घोषणा केली. चित्रपटाने प्रदर्शनाआधीच जागतिक स्तरावर एक विक्रम मोडीत काढला आहे.

मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट आगामी वर्षी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची पहिली झलक समोर आली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत चित्रपटाचा प्रोमो शेअर केला होता. अद्याप तरी चित्रपटाचा प्रोमो शेअर करण्यात आला असून तोच चित्रपटाने जागतिक स्तरावर रिलीज आधीच इतिहास रचला आहे. न्यूयॉर्कयेथील टाईम्स स्क्वेअरवर चित्रपटाचं पोस्टर झळकलं आहे.

‘शिवरायांचा छावा’ ची जगभरातील सिनेप्रेमी प्रतीक्षा करत आहेत. सध्या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटाचं मोशन पोस्टर न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या टाईम्स स्क्वेअरवर झळकलं आहे. हा विक्रम करणारा ‘शिवरायांचा छावा’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. ‘शिवरायांचा छावा’चे निर्माते मल्हार पिक्चर कंपनीने सोशल मीडियावरुन ही महत्वाची गोष्ट शेअर केली आहे. त्यांनी माहिती देताना लिहिले की, “आमचा टीझर टाईम्स स्क्वेअरवर झळकला...”

‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, विक्रम गायकवाड, अमित देशमुख, भूषण विनतरे यांच्यासह अनेक सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा न उलगडलेला इतिहास आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपट आगामी वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

SCROLL FOR NEXT