Hrithik Roshan In Metro: ट्राफिकपासून वाचण्यासाठी हृतिक रोशनने गाठली मेट्रो; प्रवासाचा अनुभव शेअर करत केली पोस्ट

Hrithik Roshan Post: 'फायटर' हृतिक रोशनने शेअर केला मेट्रो प्रवासातील अनुभव.
Hrithik Roshan Travelled By Metro
Hrithik Roshan Travelled By MetroInstagram @Hrithik Roshan
Published On

Hrithik Roshan Travelled By Metro:

बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनने नुकताच मेट्रोने प्रवास केला आहे. हृतिकने स्वतः फोटो पोस्ट करत त्याच्या मेट्रो प्रवासाची माहिती दिली आहे. हृतिक रोशनने शूटला जाण्यासाठी मेट्रोचा पर्याय निवडला असल्याचे म्हटले आहे.

हृतिक रोशनने मेट्रोमधील त्याच्या फॅन्ससोबतचे काही फोटो पोस्ट केले आहे. या फोटोंमध्ये त्याच्यासोबत सर्व वयोगटातील फॅन्सनी फोटो काढले आहेत. यात काही वृद्ध महिलांचा देखील समावेश होता.

हृतिक रोशन पोस्ट

हृतिक रोशन फॅनसोबतचे फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, 'आज कमला जाण्यासाठी मेट्रोने प्रवास केला. खरंच खूप गोड आणि विविध प्रकारची लोक भेटली. तुमच्यासोबत त्यांनी मला दिलेले प्रेम शेअर करत आहे. हा अनुभव खूप सुंदर होता. उकाडा + ट्राफिक या दोन्हींवर मात केली. स्वतःला अॅक्शन सीन आधी त्रासापासून वाचवलं.'

या फोटोंसह हृतिक रोशनने त्याचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हृतिक मेट्रोच्या एक कोपऱ्यात शांतपणे उभा असल्याचे दिसत आहे.

हृतिक रोशनसध्या त्याच्या 'फायटर' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिजी आहे. या चित्रातच दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. या चित्रपटांध्ये हृतिक रोशनसह दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर देखील आहेत. 'फायटर' २५ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे हृतिक त्याच्या 'वॉर २' चित्रपटाची देखील तयारी करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com