Jhimma 2 50 Days Complete In Theater Instagram
मनोरंजन बातम्या

Jhimma 2 50 Days Complete In Theater: ‘झिम्मा २’ अख्ख्या बॉलिवूडला पुरून उरला, बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; थिएटरमध्ये अर्धशतक पूर्ण

Jhimma 2 Box Office Collection: हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाला ५० दिवस झाले असले तरी प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या कथानकाने आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

Chetan Bodke

Jhimma 2 50 Days Complete In Theater

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाला अजूनही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या कथानकाने आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाला रिलीज होऊन आज ५० दिवस झाले असले तरी, चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. (Marathi Film)

कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले असून चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोगने केली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’नंतर 2023 मधला हा दुसरा यशस्वी मराठी चित्रपट ठरला आहे. (Film Director)

‘झिम्मा २’ ला मिळालेल्या प्रेमाबद्दलबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमेने नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना दिग्दर्शक म्हणातात, “ SUPERDUPER HIT 50 DAYS! ‘झिम्मा’ हा चित्रपट आता आमचा राहिलेला नाही, तो तुमचा झालाय... त्याचा पुढचा भाग म्हणजे ‘झिम्मा २’ तर तुम्ही आधीपेक्षाही त्याला जास्त मोठा केलंत... तुम्ही त्याचा सोहळा केलात… आमच्या काळजाचा तुकडा अतिशय प्रेमाने आपला केलात त्याबद्दल तुमचे शतशः आभार!” असं म्हणत दिग्दर्शकांनी चाहत्यांचे आभार मानले. (Social Media)

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ने आजवर बॉक्स ऑफिसवर १३ कोटींची कमाई केलेली आहे. २०२३ हे वर्ष खरंतर मराठी चित्रपटांसाठी खूप खास ठरलं आहे. सर्वात आधी 'वेड', 'बाईपण भारी देवा' आणि आता 'झिम्मा २' या तिनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश संपादन केले आहे. 'झिम्मा २'ची कथा सगळ्यांना भावली असून जगभरात चित्रपटाचे कौतुक आहे. 'झिम्मा २'ची कमाई ही अपेक्षेपलिकडची आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

SCROLL FOR NEXT