Jhimma 2 Instagram
मनोरंजन बातम्या

Jhimma 2 Day 6 Collection: ‘झिम्मा २’मधील मराठी पोरींचा बॉक्स ऑफिसवर कल्ला, ६ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

Jhimma 2 Box Office Collection: नुकताच प्रदर्शित झालेला हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ची सध्या बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे.

Chetan Bodke

Jhimma 2 Box Office Day 6 Collection

नुकताच प्रदर्शित झालेला हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ची सध्या बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु केली आहे. पहिल्याच विकेंडला चित्रपटाने कोट्यवधींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात बक्कळ कमाई (Jhimma 2 Box Office Collection) करत बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या विकेंडला ५ कोटींच्या आसपास कमाई केली आहे. तर सोमवारी चित्रपटाने १ कोटी, मंगळवारी ५५ लाख तर बुधवारी ७० लाखांची कमाई करत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई केली आहे. ‘झिम्मा २’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी पाहायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच चित्रपटाला दमदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

एका आठवड्यामध्ये चित्रपटाने ७ कोटींच्या आसपासची कमाई केली आहे. चित्रपटाचा सध्याचा आलेख पाहता हेमंत ढोमेचा ‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘झिम्मा’चा पहिला भाग गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. फक्त प्रेक्षकांकडूनच नाही तर, सेलिब्रिटींकडूनही आणि समीक्षकांकडूनही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सुपरडुपरहिट चित्रपट ठरला होता. (Marathi Film)

कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपट गेल्या २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर या तगड्या स्टारकास्टने मुख्य भूमिका साकारली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT