Adinath Kothare And Mahesh Kothare News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adinath Kothare : बँकेचे हफ्ते थकले अन् मुंबईत बेघर झालो...; आदिनाथ कोठारेने सांगितला कुटुंबावर ओढावलेला वाईट काळ

Adinath Kothare On Father Mahesh Kothare Struggling Period : सध्या आदिनाथ कोठारे त्याच्या 'शक्तीमान' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यावेळी अभिनेत्याने त्याच्या कुटुंबीयांवर २००५ साली ओढावलेल्या वाईट काळावर त्याने भाष्य केले आहे.

Chetan Bodke

मराठी सिनेसृष्टीमध्ये बालकलाकार म्हणून आपल्या सिनेकरियरची सुरूवात करणारा अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे. आदिनाथने आपल्या सिनेकरियरमध्ये चाहत्यांना अनेक दमदार हिट चित्रपट दिलेले आहेत. आदिनाथ कोठारे कायमच सोशल मीडियावर आपल्या अभिनयासोबतच फॅशनमुळेही तो चर्चेत असतो. लवकरच आदिनाथचा 'शक्तीमान' चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सध्या तो या चित्रपटानिमित्त प्रमोशनसाठी वेगवेगळ्या मुलाखती देत आहे. यावेळी अभिनेत्याने त्याच्या फॅमिलीवर ओढावलेल्या संकटावर भाष्य केले आहे.

एका मराठी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये, आदिनाथ कोठारेने सांगितले की, " त्यावेळी माझं टीवाय पूर्ण झालं होतं आणि ग्रॅज्युएशनच्या नंतरचं शिक्षण मला पूर्ण करायचं होतं. त्यावेळी आमच्या घरातील आर्थिक परिस्थिती फार हालाकीची होती. कारण, बाबांचे त्यावेळी दोन चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यामुळे आमच्यावर मोठं कर्ज होतं. त्यावेळी आम्ही कोल्हापूरात 'खबरदार' चित्रपटाचं शुटिंग करत होतो. आणि मी बाबांना या चित्रपटासाठी असिस्ट करत होतो. खरंतर, चित्रपटानिमित्त मी पहिल्यांदाच बाबांसोबत काम केलं होतं. एकाबाजूला घरातील आर्थिक परिस्थिती हालाकीची होती तर, दुसऱ्या बाजुला कामावर फोकस ठेवून शुटिंग पूर्ण करायची होती. "

आदिनाथ कोठारे पुढे मुलाखतीमध्ये म्हणाला, " कोल्हापूरात चित्रपटाची शुटिंग सुरु असताना आमचं मुंबईतलं घर बँकेने सील केलं होतं. त्यामुळे आम्हाला मुंबईत राहायला घरच नव्हतं. ही सर्व गोष्ट आई- बाबांनी मला आणि माझ्या आजी- आजोबांना सांगितलीच नव्हती. या सर्व गोंधळात आम्ही चित्रपटाचं शुटिंग कोल्हापूरात पूर्ण केलं. शुटिंग संपवल्यानंतर काही दिवसांसाठी मी आणि माझे आजी- आजोबा पुण्यात शिफ्ट झालो आणि आई- बाबा मुंबईत घर शोधत होते. शेवटी त्यांना कांदिवलीत घर मिळालं आणि मग आम्ही सर्व मुंबईत शिफ्ट झालो. हा सर्व किस्सा २००५ या वर्षातला आहे."

मुलाखतीच्या शेवटच्या भागात आदिनाथ म्हणाला, " माझ्या आयुष्यातले खरे शक्तीमान माझे आई- वडिल आहेत. त्या हालाखीच्या परिस्थितही बाबांनी माझ्या पुढच्या शिक्षणासाठी कर्ज काढलं होतं. ते कसं फेडणार ?, कोण फेडणार ? अशा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्यांनी माझ्यासाठी लोन काढलं. काहीही असो, शिक्षण थांबता कामा नये, यासाठी वडिलांनी माझ्यासाठी लोन काढलं होतं. बाबांनी हा सर्व किस्सा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'डॅमेट आणि बरंच काही'या पुस्तकातही लिहिलेला आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT