Boyz 4 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Boyz 4 New Song: गावाच्या सुंदर आठवणीत रमवणारं Boyz 4 मधलं नवं गाणं प्रदर्शित; 'गाव सुटना' अस्सल गावरान गाणं प्रदर्शित

Boyz 4 Movie New Song Release: 'बॉईज 4' चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Chetan Bodke

Boyz 4 Movie Song 'गाव सुटना' :

मराठीतील सुपरहिट चित्रपट 'बॉईज' चित्रपटाचा ४ था भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बॉईज 4' चित्रपटाची सर्वत्र खूप जास्त चर्चा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता गाणं प्रदर्शित झाले आहे. गावाची ओढ लावणारं 'गाव सुटंना' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

याआधी 'बॉइज 4' चित्रपटातील पहिलं रॅप सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्यानंतर आता नवीन गाणं ‘गाव सुटंना’ प्रदर्शित झाले आहे. गावाची आठवण करुन देणारे हे भावनिक गाणे आहे. हे गाणे गणेश शिंदे यांनी लिहले असून अवधूत गुप्तेने संगीत दिले आहे. हे गाणं प्रतिक लाड आणि रितुजावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे पद्मनाभ गायकवाड यांनी गायले आहे.

माणूस आपल्या कामासाठी कितीही लांब गेला तरी त्याची नाळ ही नेहमीच गावासोबत जोडलेली असते. हेच या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. गावाचे सुंदर वर्णन या गाण्यातून करण्यात आले आहे. गावाची ओढ या गाण्यातून दाखवण्यात आली आहे.

या गाण्याबाबत अवधुत गुप्तेने माहिती दिली आहे. " `गाव सुटंना`हे मनाला भारावणारे गाणे आपल्या गावच्या आठवणी ताज्या करणारे आहे. आपल्या मातृभूमीपासून दूर परदेशात राहणाऱ्या प्रत्येकाला जवळचे वाटेल, असे हे गाणे आहे. प्रत्येक ओळीत भावना दडलेल्या आहेत. त्यामुळे रॅप साँगनंतर प्रेक्षकांना हे गाणेसुद्धा नक्कीच आवडेल.’’असं अवधूत गुप्ते म्हणाला.

'बॉईज 4' चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 20 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कोणत्या वस्तू खरेदी करू नये?

Golden Man Crime : पुण्यासारखं पनवेलमध्येही गँगवॉर, गोल्डमॅन अन् म्हात्रे भिडले, १४ आरोपींवर गुन्हा, वाचा नेमकं प्रकरण

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी खुशखबर, ऑगस्टचे ₹१५०० खात्यात खटाखट येणार, सरकारने उचलले मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागचा राजा मंडळात गरबा होणार; गणेश मंडळ उद्योगपतींकडून हॅकजॅक, मनसेचा आरोप

SCROLL FOR NEXT