Short And Sweet Teaser Instagram
मनोरंजन बातम्या

Sshort And Ssweet Teaser: ‘शॉर्ट अँड स्वीट’चा स्वीट टीझर लाँच, कुटुंबातील गोड नात्यावर चित्रपट भाष्य करणार

Short And Sweet Film Teaser: ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Short And Sweet Teaser

सध्या मराठी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर तुफान चर्चा होताना दिसत आहे. अशातच सध्या एका मराठी चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. नुकताच ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटाचा टीझर लाँच झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. पोस्टरनंतर आता चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

शुभम प्रोडक्शन प्रस्तुत आणि गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाची तुफान चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वाटसर, रसिका सुनील हे सेलिब्रिटी आहेत. निर्मात्यांनी शेअर केलेल्या टीझरमध्ये, अनेक वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा घरी आलेला संजू आपल्या वडीलांना भेटण्यासाठी खूपच उत्सुक दिसतोय. आधी उत्साही झालेला संजू वडीलांना भेटल्यावर का नाराज होतो?, त्याच्या आईने संजूपासून कोणती गोष्ट लपवली?, याचं उत्तर प्रेक्षकांना येत्या ३ नोव्हेंबरला मिळणार आहे. (Marathi Film)

दिग्दर्शक गणेश दिनकर कदम चित्रपटाविषयी सांगतात, “ ‘शॉर्ट अँड स्वीट’ हा चित्रपट कौटुंबिक असून नावाप्रमाणेच चित्रपटाची कथाही स्वीटंच आहे. चित्रपटाच्या टीझरवरून एकूणच चित्रपटाच्या कथेबद्दल अंदाज प्रेक्षकांना आला असेल. ताकदीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मराठी, हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाची छाप पाडणारे श्रीधर वाटसर व मालिकेतून घराघरांत पोहोचलेले हर्षद अतकरी आणि रसिका सुनील यांसारख्या उत्कृष्ट कलाकारांनी चित्रपटात दमदार काम केले आहे. सोबतच, यूट्यूबर आणि रील विश्वातील तुषार खैर व कॉमेडी किंग ओमकार भोजणे ही पाहायला मिळतील. मनोरंजनात्मक आणि संवेदनशील विषय असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.” (Actress)

‘शॉर्ट अँड स्वीट’चे दिग्दर्शन गणेश दिनकर कदम यांनी केले असून पायल गणेश कदम व विनोद राव यांनी चित्रपटाचे निर्माती केली आहे. शुभम प्रोडक्शन प्रस्तुत चित्रपटाची कथेचे लेखन स्वप्नील बारस्कर यांचे असून चित्रपट येत्या ३ ऑक्टोबर २०२३ ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT