Mitali Mayekar And Siddharth Chandekar Photo from Paris Instagram
मनोरंजन बातम्या

Mitali Mayekar Photo: सिद्धार्थ-मितालीचं आयफेल टॉवरसमोर लिपलॉक, रोमँटिक फोटो व्हायरल!

Mitali Mayekar Post: अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटत आहे.

Chetan Bodke

Mitali Mayekar And Siddharth Chandekar Photo from Paris: अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटत आहे. सध्या त्यांच्या व्हेकेशनमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ दोघेही सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मितालीने नुकतेच पॅरिसमधील एक फोटो शेअर केला आहे. सध्या त्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. मितालीने सोशल मीडियावर प्रेमाचं प्रतिक असलेल्या आयफिल टॉवरच्या बाजुला किस करतानाचा फोटो शेअर केला आहे.

मिताली आणि सिद्धार्थ हे दोघेही काही दिवसांपासून युरोपमध्ये आपली सुट्टी घालवताना दिसत आहे. हे दोघेही सोशल मीडियावर तेथील अनेक फोटो शेअर करत चाहत्यांना तेथील नयनरम्य ठिकाणांची सफर घडवत आहेत. सोबतच मितालीने नुकताच पॅरिसमधल्या ‘गेटवे ऑफ इंडिया’सोबत फोटो काढून तिने चाहत्यांसोबत फोटो शेअर केला.

सोशल मीडियावर फोटो शेअर करताना मितालीने फोटोला कॅप्शन देत शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्री म्हणते, “कारण, तू पाहतोस, मी तुझ्यावर दररोज जास्त प्रेम करते, कालपेक्षा आज जास्त आणि उद्यापेक्षा खूप कमी मी तुझ्यावर प्रेम करते -रोसेमोंडे गेरार्ड.” रोसेमोंडे गेरार्ड यांचं हे वाक्य अभिनेत्रीने कॅप्शन देत फोटो शेअर केला.

मिताली आणि सिद्धार्थने प्रेमाचे प्रतिक असलेल्या पॅरिसमधल्या आयफिल टॉवरच्या समोर हा फोटो काढलाय. सिद्धार्थने ऑफ वाईट रंगाचा सूट परिधान केला आहे, तर मिताली पिंक कलरचा ऑफ शोल्डर फ्रॉक घातला आहे. हे रोमँटिक कपल फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत असून नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर काही युजर्सने त्यांना ट्रोल केले आहे तर, काहींनी त्यांच्या फोटोंचे कौतुक केले आहे.

मिताली आणि सिद्धार्थच्या फोटोंवर काही सेलिब्रिटींसह अनेक चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर कमेंट केली आहे. या फोटोवर सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, गायत्री दातार, ऋतुजा बागवेसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केली आहे. या सेलिब्रिटींनी मिताली आणि सिद्धार्थच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत फोटोला लाईक केले आहे.

तर एका चाहता मिताली आणि सिद्धार्थच्या फोटोवर कमेंट करत म्हणतो, ‘कोणीतरी यांची नजर काढा’ तर आणखी एक म्हणतो, ‘टायटॅनिक मधली पोज आयकॉन एक होती आतापर्यंत, आता नाही...’ असं म्हणत एकाने त्यांना ट्रोल केलंय. खूपच सुंदर म्हणत अनेकांनी त्यांच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

SCROLL FOR NEXT