Satyaprem Ki Katha Makers Budget: ‘सत्यप्रेम की कथा’च्या एका गाण्यावर कियाराच्या मानधनाहून दुप्पट पैशांची उधळण, असं काय आहे गाण्यात?

Satyaprem Ki Katha Song: गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची शूटिंग संपली असून निर्मात्यांनी चित्रपटातील एका गाण्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केल्याची माहिती मिळत आहे.
Satyaprem Ki Katha Makers Budget
Satyaprem Ki Katha Makers BudgetSaam Tv

Satyaprem Ki Katha Music: कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘सत्याप्रेम की कथा’ चा नुकताच ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. ट्रेलर सध्या चांगलाच चर्चेत आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची शूटिंग संपली. नुकतंच सोशल मीडियावर शूटिंगमधले अनेक किस्से व्हायरल होत आहे. त्यातीलच एक म्हणजे, निर्मात्यांनी गाण्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला.

Satyaprem Ki Katha Makers Budget
Ayushmann-Aparshakti Spotted With Mother : आयुष्मान - अपारशक्तीचा आईसोबतच इमोशनल व्हिडिओ व्हायरल ; वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच स्पॉट झाले संपूर्ण कुटुंब

चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत असून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल खूपच उत्सुकता आहे. चित्रपटाचं शूटिंग नुकतंच एका गाण्याच्या शूटिंगसोबत संपलं. नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, नुकतच जे गाणं शूट केलं, त्या गाण्यावर निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. आणि जर तुम्हाला तो खर्च काळाला तर नक्कीच मोठा धक्का बसेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी फक्त एका गाण्यासाठी जवळपास, ७ कोटी इतका पैसा खर्च केला आहे. हे गाणं इंट्रोडक्टरी असून एका वेडिंग थीमवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. अशी चर्चा आहे की, या गाण्यात एकूण चार पद्धतीने लग्न दाखवण्यात येणार असून त्यामध्ये चार वेगळे सेट उभारले जाणार आहे. चार पद्धतींच्या लग्नात साऊथ इंडियन, मुस्लिम, गुजराती आणि ख्रिश्चन पद्धतीने केले जाणार आहे.

Satyaprem Ki Katha Makers Budget
Baal Shivaji Poster Out: आता आकाश ठोसर साकारणार ‘बाल शिवाजी', ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित...

कार्तिक आर्यनने दिलेल्या माहितीप्रमाणे, एका गाण्यासाठी निर्मात्यांनी इतका अफाट पैसा खर्च केला. या गाण्याच्या शूटिंगचा खर्च कियारा आणि कार्तिकच्या मानधना इतके आहे. कियाराला या चित्रपटासाठी ४ कोटी इतके मानधन मिळाले असून कार्तिक आर्यनला चित्रपटासाठी २५ कोटी इतके मानधन मिळाले आहे.

‘सत्यप्रेम की कथा’ च्या पूर्वी ही जोडी ‘भूलभुलैया २’ मध्ये दिसली होती. आता त्या नंतर थेट ही जोडी या चित्रपटात एकत्र दिसली. हा चित्रपट येत्या २९ जूनला प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com