Kushal Badrike Shared Holi Celebration Video Instagram
मनोरंजन बातम्या

Kushal Badrike: 'बालपण मागे सुटत जातं, पण खोड्या...' कुशल बद्रिकेने शेअर केला होळी सेलिब्रेशनचा खास VIDEO

Kushal Badrike Holi Video: मराठमोळा अभिनेता आणि कॉमेडीवीर कुशल बद्रिके सध्या होळी सण साजरा करताना दिसत असून त्याने धम्माल मस्ती करतानाचे काही व्हिडीओज शेअर केलेले आहेत.

Chetan Bodke

Kushal Badrike Shared Holi Celebration Video

सध्या राज्यासह देशभरामध्ये धुलिवंदन सण (Dhulivandan Festival) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अगदी लहाणांपासून ते थोऱ्या मोठ्यापर्यंत सर्वच एकत्र येत हा सण साजरा करीत आहेत. सध्या अनेक सेलिब्रिटी होळी सण (Holi Festival) दणक्यात साजरा करताना दिसत आहे.

मराठमोळा अभिनेता आणि कॉमेडीवीर कुशल बद्रिकेही (Actor Kushal Badrike) होळी सण साजरा करताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत होळीला धम्माल मस्ती करतानाचे काही व्हिडीओज शेअर केलेले आहेत.

होळी सणाला होलिका दहन केले जाते. यावेळी सर्व एकत्र येत होलिकेची पूजा करतात. त्यानंतर होलिका दहन केलं जातं. अभिनेता कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्याच्या फॅमिलीसोबत होळी सेलिब्रेशन करताना दिसत आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये, अभिनेत्याने बालपणीच्या किस्स्याला उजाळा दिलेला आहे. कुशलने पोस्टमध्ये लिहिलेय की, "पेटत्या होळीतला नारळ काढायचा आणि प्रसाद म्हणून खायचा. बालपणा पासूनच्या खोड्या! बालपण मागे सुटत जातं, खोड्या सुटत नाहीत."

सोबतच अभिनेत्याने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छाही दिलेल्या आहेत. कुशलनं शेअर केलेल्या या व्हिडीओला त्याच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे. कुशलच्या चाहत्यांनीही यावेळी त्यांच्या आठवणी कमेंटमध्ये शेअर केलेल्या आहेत. कुशलच्या व्हिडीओवर सेलिब्रिटींसह अनेक चाहत्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत. सध्या कुशल बद्रिके सोनी टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या हिंदी कॉमेडी शोच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT