Tejaswini Pandit Started New Salon Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडितने नव्या व्यवसायात ठेवलं पाऊल, पुण्यात सुरू केलं आलिशान सलून; VIDEO व्हायरल

Tejaswini Pandit Started New Salon: तेजस्विनी पंडीतने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नव्या सलूनचा व्हिडीओ शेअर केला आहे. नुकताच या सलूनचा उद्घाटन सोहळा पार पडला. तिने शेअर केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून तिने या नव्या आलिशान सलूनची झलक दाखवली आहे.

Priya More

Marathi Actress Tejaswini Pandit:

मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) अनेक कलाकार हे नेहमी त्यांच्या नव्या चित्रपट, नवा प्रोजेक्ट आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. सध्या मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांमध्ये नवा ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक कलाकार आता अभिनयक्षेत्राव्यतिरिक्त इतर व्यवसायांमध्ये पाऊल ठेवताना दिसत आहेत.

आतापर्यंत महेश मांजरेकर, सुप्रिया पाठारे, निरंजन कुलकर्णी, प्राजक्ता माळी, श्रेया बुगडे या कलाकारांनी नव्या व्यवसायाला सुरूवात केली. काहींनी दागिने असो किंवा हॉटेल क्षेत्रात त्यांनी पाऊल ठेवले. त्यांच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. आता या कलाकारांच्या यादीमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. तेजस्विनी पंडीतने (Tejaswini Pandit) पुण्यामध्ये सलून सुरू केले आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नव्या सलूनचा व्हिडीओ शेअर केला आहे. नुकताच या सलूनचा उद्घाटन सोहळा पार पडला. तिने शेअर केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून तिने या नव्या आलिशान सलूनची झलक दाखवली आहे. या सलूनच्या उद्घाटन सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावत तेजस्विनीला शुभेच्छा दिल्या. त्याचसोबत या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील हजेरी लावत तेजस्विनीला शुभेच्छा दिल्या.

तेजस्विनीने हे आलिशान सलून पुण्यामध्ये सुरू केले आहे. तिने या सलूनला 'एम टू एम' असे नाव दिले आहे. तेजस्विनीने हा व्यवसाय पूनम शेंडे आणि तिच्या संपूर्ण टीमसह एकत्र येत सुरू केला आहे. मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणारे हे पुण्यातील पहिले सलून असणार आहे. तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची संपूर्ण टीम दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तेजस्विनीच्या या सलूनचीच चर्चा सुरू आहे.

तेजस्विनी पंडतीने इन्स्टाग्रामवर नव्या सलूनचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माननीय राज ठाकरेसाहेब तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात यासाठी तुमचे खूप खूप आभार! ‘एम टू एम’ हे पुण्यातील पहिलं मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणारं सलून आहे. तुम्हीसुद्धा नक्की या!' तेजस्विनीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी पसंती देत तिला नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचसोबत, अश्विनी शेंडे, विशाखा सुभेदार आणि सिद्धार्थ जाधव या कलकारांनी तेजस्विनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

SCROLL FOR NEXT