Ankita Lokhande: 'बिग बॉस 17' मधून बाहेर पडताच अंकिता लोखंडेचं नशीब चमकलं

Bigg Boss 17: अंकिता या शोची ट्रॉफी जिंकेल असे तिच्या चाहत्यांना वाटत होते. बिग बॉसच्या टॉप ५ मध्ये अंकिता होती. पण या शोची ट्रॉफी जिंकण्यात तिला यश मिळाले नाही. मुनव्वर फारुकी या शोचा विजेता ठरला.
Ankita Lokhande
Ankita LokhandeSaam TV
Published On

Swatantrya Veer Savarkar Film:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस'चा 17 वा सीझनने (Bigg Boss 17) नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या शोमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) चांगलीच चर्चेत होती. अंकिता या शोची ट्रॉफी जिंकेल असे तिच्या चाहत्यांना वाटत होते.

बिग बॉसच्या टॉप ५ मध्ये अंकिता होती. पण या शोची ट्रॉफी जिंकण्यात तिला यश मिळाले नाही. मुनव्वर फारुकी या शोचा विजेता ठरला. या शोची ट्रॉफी जरी अंकिताने जिंकली नसली तरी देखील बिग बॉस 17 च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताचे नशीब चमकले आहे. अंकिताच्या हाती मोठा बॉलिवूड चित्रपट लागला आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाच्या (Randeep Hooda) दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला 'स्वातंत्रवीर सावरकर' हा चित्रपटाची (swatantrya veer savarkar) सध्या चांगलीच चर्चा होत आहे. हा चित्रपट मार्च २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेमध्ये आहे. तर अंकिता लोखंडे देखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अंकिता लोखंडे बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. अंकिताने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाबाबत पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

'स्वातंत्रवीर सावरकर' हा चित्रपट एका ऐतिहासिक व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डाने केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीप हुड्डाने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. रणदीप हुड्डाने सांगितले की, 'श्री सावरकरांनी काळ्यापाण्यामध्ये जवळपास दोन वर्षे घालवल्यानंतर आता त्यांच्यासाठी स्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. पण मला एक अभिनेता म्हणून स्वतःच्याही पुढे जाऊन चित्रपट दिग्दर्शक करण्याची आणि बरेच काही करण्याची प्रेरणा मिळाली.'

Ankita Lokhande
Shantanu Maheshwari: 'गंगूबाई काठियावाडी' फेम अभिनेत्याचे बँक अकाऊंट झालं हॅक, सोशल मीडियावर पोस्टद्वारे केला धक्कादायक खुलासा

दरम्यान, रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे आणि अमित सियाल स्टारर हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘स्वातंत्रवीर सावरकर’ हा भारतातील स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Ankita Lokhande
Salman Khan च्या नावावर कास्टिंग फसवणूक, अभिनेत्याच्या प्रॉडक्शन हाऊसने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com