Ashok Saraf: ... म्हणून मी नि:शद्ध झालोय, महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Bhushan Award: महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांनी पहिली प्रतिक्रया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अशोक सराफ यांनी या पुरस्कारासाठी नावाची घोषणा झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
Ashok Saraf
Ashok SarafSaam Tv
Published On

Ashok Saraf On Maharashtra Bhushan Award:

मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Film Industry) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून याबाबतची माहिती देत अशोक सराफ यांचे अभिनंदन केले.

सध्या सर्वस्तरावरून अशोक सराफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांनी पहिली प्रतिक्रया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अशोक सराफ यांनी या पुरस्कारासाठी नावाची घोषणा झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर 'मी नि:शब्ध झालो', असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांनी एका वृत्तवाहिनीला पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'मला एवढ्या लवकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळेल असं वाटलं नव्हतं. मला माझं काम तेवढंही वाटत नव्हतं. मला महाराष्ट्र भूषण दिग्गजांच्या पंक्तीला नेऊन बसवलंय त्यामुळे मी नि:शब्द झालो आहे. ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे ते थोर लोकं आहेत. त्यामुळे मी काहीतरी केलं आहे याची जाणीव मला व्हायला लागली आहे. तुम्ही ती मला करुन दिली हे मी कधीच विसरणार नाही.'

Ashok Saraf
Ankita Lokhande: 'बिग बॉस 17' मधून बाहेर पडताच अंकिता लोखंडेचं नशीब चमकलं

अशोक सराफ यांनी पुढे असे देखील सांगितले की, 'मी अतिशय भारावून गेलो आहे. या सगळ्यामुळे मला आणखी काही तरी चांगलं आणि वेगळं करायचंय या जाणीवेने मी आता बांधलो गेलो आहे. मी सिलेक्टेड काम करतोय. पण निश्चितच मी काम करत राहणार आहे. तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. मी तुमच्याशिवाय राहूच शकत नाही. त्यामुळे काम करायलाच पाहिजे.', असं सांगत अशोक सराफ यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक्सवर पोस्ट करत असे लिहिले होते की, 'ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.'

Ashok Saraf
Shantanu Maheshwari: 'गंगूबाई काठियावाडी' फेम अभिनेत्याचे बँक अकाऊंट झालं हॅक, सोशल मीडियावर पोस्टद्वारे केला धक्कादायक खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com