Tejaswini Pandit Shared On Raj Thackeray Video Instagram
मनोरंजन बातम्या

Tejaswini Pandit: '२६ जानेवारी गेली की...'; तेजस्विनी पंडितने शेअर केला राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ, लक्षवेधी पोस्ट चर्चेत

Tejaswini Pandit Post: अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने इन्स्टाग्रामवर मनसे नेते राज ठाकरे यांच्याबद्दल एक इन्स्टा स्टोरी शेअर करत “हा माणूस कधी कळेल महाराष्ट्राला?” असा सवाल विचारला आहे.

Chetan Bodke

Tejaswini Pandit Shared On Raj Thackeray Video

प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडित आपल्या अभिनयासह आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते. तेजस्विनी पंडितने आपल्या चाहत्यांचे फक्त चित्रपटातूनच नाही तर वेबसीरिज, मालिका आणि नाटकांतूनही निखळ मनोरंजन केले आहे.

तेजस्विनी अनेकदा सोशल मीडियावर रोखठोक वक्तव्य आणि राजकारणावर आपलं परखड मत मांडत असते. अशातच सध्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने इन्स्टाग्रामवर मनसे नेते राज ठाकरे यांच्याबद्दल एक इन्स्टा स्टोरी शेअर करत “हा माणूस कधी कळेल महाराष्ट्राला?” असा सवाल विचारला आहे. (Marathi Actress)

तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला माणूस भारतीय होतो. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी गेली की तो बंगाली, गुजराती, तामिळ सर्वकाही होतो. मग एके दिवशी तो जेव्हा मराठा होतो तेव्हा मराठा, ब्राह्मण, कुणबी, कोळी असा सगळा होतो. ‘फादर्स डे’, ‘मदर्स डे’ सारखे आपणही हे वाटून घेतले आहेत. दंगलीत ‘हिंदू डे’, १५ ऑगस्ट-२६ जानेवारीला ‘भारतीय डे’, एरव्ही ‘मराठी डे’ आणि झालाच तर आमच्या ‘जातीचे डे’… आपल्याला एक ठेवणारी कोणती गोष्ट असेल तर मला वाटतं ती आपली मराठी भाषा” असं त्या व्हिडीओमध्ये राज ठाकरे म्हणत आहेत. (Raj Thackeray)

Tejaswini Pandit Shared On Raj Thackeray Video

हा व्हिडीओ मनसेच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडवरील आहे. या व्हिडीओला “छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती-धर्मापलीकडे एकत्र बांधलेल्या रयतेची वज्रमूठ कोण कमकुवत करतंय?”, असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. हाच व्हिडीओ शेअर करत तेजस्विनीने “हा माणूस कधी कळेल महाराष्ट्राला?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे तेजस्विनीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Social Media)

तेजस्विनीने याआधी अनेकदा राजकारणाबद्दलचं मत मांडलं आहे. एकदा तेजस्विनी “राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे आपलं दुर्देव आहे, असं सुद्धा ती म्हणाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावेत, अशी इच्छाही व्यक्त केली होती. (Marathi News)

तिच्या कामाबद्दल बोलायचे तर, गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसाद खांडेकर निर्मित आणि दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर तिला सर्वाधिक प्रसिद्धी ‘रानबाजार’ या वेबसीरीजमुळेही मिळाली आहे. लवकरच ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ या ऐतिहासिक चित्रपटातून राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनयासोबतच तेजस्विनीने ‘अथांग’ वेबसीरीजच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुंबादेवी मतदारसंघात मनसे आणि शिवसेना शिंदे गटाची छुपी युती?

CJI DY Chandrachud : कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा; निरोप समारभांच्या भाषणात सरन्यायाधीश चंद्रचूड नेमकं काय म्हणाले?

IND vs SA 1st T20I: यजमान दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय; प्लेइंग ११ मध्ये कोणाला मिळालं स्थान?

Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? अमित शहांच्या वक्तव्यानंतर भाजपमधून आली पहिली प्रतिक्रिया

IND vs AUS: BGT आधी टीम इंडियाचा तळ्यात मळ्यात कारभार! 2 प्रश्नांनी वाढवलंय टेन्शन

SCROLL FOR NEXT