Sukanya Mone Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sarfarosh Film : ‘सरफरोश’ला २५ वर्षे पूर्ण, रियुनियन पार्टीचं आयोजन; टीमला भेटून सुकन्या मोने भारावल्या

Sukanya Mone Post : गेल्या ३० एप्रिलला ‘सरफरोश’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाले. या निमित्त निर्मात्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी रियुनियन पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळचा अनुभव अभिनेत्री सुकन्या मोने यांनी पोस्टच्या माध्यमातून शेअर केलेला आहे.

Chetan Bodke

जॉन मेथ्यू मॅटन दिग्दर्शित ‘सरफरोश’ चित्रपट १९९९ मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाला नुकतेच २५ वर्ष पूर्ण झालेले आहेत. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आमिर खान, सोनाली बेंद्रे, नसिरूद्दीन शाह, नवाझुद्दिन सिद्दीकी, मुकेश ऋषी, मकरंद देशपांडे, मराठमोळी अभिनेत्री सुकन्या मोने अशी तगडी स्टारकास्ट होती.

नुकतंच या चित्रपटाला २५ वर्षे झाले आहेत. यानिमित्त चित्रपटाच्या टीमचं रियुनियन आयोजित करण्यात आलं होतं. सुकन्या मोने यांनी चित्रपटात आमिप खानच्या वहिनींचं पात्र साकारलं होतं. यावेळी संपूर्ण चित्रपटाची टीम उपस्थित होती.

या रियुनियन दरम्यानचे फोटो अभिनेत्री सुकन्या मोने यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी संपूर्ण टीमला पुन्हा एकत्र पाहून अभिनेत्री सुकन्या मोने भारावल्या आहेत.

अनुभव शेअर करताना सुकन्या मोने म्हणाल्या,

"कालचा दिवस खास होता... माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असे घडतं होते... आपण एखादा चित्रपट करतो आणि काही वर्षांनी तो गतस्मृतीत जातो... पण 'सरफरोष' हा सगळ्याच दृष्टीने माझ्यासाठी विशेष उल्लेखनीय चित्रपट आहे. आमिर खान माझा लाडका अभिनेता त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळणार होती. माझी आणि जॉन Mathew matthan ची पहिली भेट... दिल्लीतले चित्रीकरण... माझी, सोनालीची आणि स्मिता जयकरची झालेली घट्ट मैत्री... आम्ही केलेली धमाल... त्या चित्रपटाला काल २५ वर्षे झाली आणि त्या निमित्ताने रेडिओ नाशाने ठेवलेला खास शो... Thank you so much @rotalks .... त्यानिमित्ताने झालेलं re union.... सगळ्या जुन्या आठवणी.... शूटिंग दरम्यान झालेल्या गमती जमती.... इतक्या वर्षांनी सोनालीने मारलेली घट्ट मिठी ... आमिर चे मराठी बोलण,वागण्यातला आपलेपणा,काळजी... मनोज जोशी ची भेट... जॉन आणि आभाचे अगत्याचे आमंत्रण.... जॉनचां साधेपणा... त्याच्या कुटुंबाचा आपलेपणा... भारवून गेले होते. पुन्हा पुन्हा भेटत राहू"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Action: महाराष्ट्रातील दोन बँकांवर आरबीआयची कारवाई, एकाचा परवानाच रद्द , ठेवीदारांचा जीव टांगणीला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण रुसली! दिवाळी तोंडावर, पण ₹ १५०० मिळेनात!

Maharashtra Live News Update: ..तर सरकारच्या विरोधात जाणार; मंत्री विखेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

India vs South Africa : भारताच्या स्टार क्रिकेटपटूची हटके कामगिरी; अवघ्या २३ धावा करून २८ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

वास्तू शास्त्रानुसार 'या' ३ संकेतांकडे दुर्लक्ष करू नये

SCROLL FOR NEXT