टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. येत्या १५ ऑगस्टला ‘पुष्पा द रुल’ थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट बिग बजेट चित्रपटांपैकी एक असून चित्रपट तुफान चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपू्र्वीच ह्या चित्रपटाचे ओटीटी राईट्स, सॅटेलाईट्स राईट्स आणि हिंदीचे थिएट्रिकल राईट्स विकल्याचे वृत्त आले होते. अशातच आता कर्नाटकचे थिएट्रिकल राईट्स विकल्याचे वृत्त समोर आले आहेत.
(Pushpa The Rule Sold Karnataka Theatrical Rights)
123 तेलुगूच्या रिपोर्टनुसार, कर्नाटकसाठी ‘पुष्पा द रुल’ चे थिएट्रिकल राईट्स ‘एन. सिनेमाज’ कंपनीने विकत घेतलेले आहेत. खरंतर हे थिएट्रिकल राईट्स किती कोटींना विकले आहेत, याबद्दल कळू शकलेलं नाही. पहिल्या भागाप्रमाणेच सुकुमार या चित्रपटाचेही दिग्दर्शन करत आहेत. पुन्हा एकदा या चित्रपटातही रश्मिका मंदान्ना आणि अल्लू अर्जुन एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.
आतापर्यंत चित्रपटाचा टीझर, टायटल साँग आणि कॅरेक्टर पोस्टर्स शेअर केलेले आहेत. सध्या प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाची निर्मिती ५०० कोटींमध्ये झालेली आहे. चित्रपटाने रिलीजच्या आधीच जोरदार कमाई केलेली आहे. कर्नाटक थिएट्रिकल राईट्स किती कोटींना विकले आहेत, याबद्दल कळू शकलेलं नाही. यापूर्वी विकलेल्या राईट्सच्या माध्यमातून निर्मात्यांनी भरपूर कमाई केली आहे.
रिपोर्टनुसार, ‘पुष्पा द रुल’चे हिंदी थिएट्रिकल राईट्स २०० कोटी रुपयांना विकले आहेत. तर नेटफ्लिक्सने २७५ कोटी रुपयांना ओटीटी राईट्स विकत घेतले आहेत. त्यानंतर या चित्रपटाचे सॅटेलाइट राईट्स विकले गेल्याचीही माहिती समोर आली आहे. जयंतीलाल गडा यांनी चित्रपटाच्या सर्व व्हर्जनचे सॅटेलाइट राईट्स विकत घेतले असून त्यासाठी त्यांनी निर्मात्यांना ८० कोटी रुपये दिले असल्याचे सांगण्यात आले.
५०० कोटींच्या बजेटमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा २’चा समावेश असणार आहे. ‘पुष्पा’प्रमाणेच ‘पुष्पा २’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करेल, यामध्ये शंका नाही. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदानाही स्क्रीन शेअर करणार आहे. तर फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.