Pushpa 2 च्या आणखी एका पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता; चाहत्यांना मिळणार मोठं सरप्राईज

Allu Arjun Movie: 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिलंय. निर्मात्यांनी चित्रपटाचे आखणी एक नवीन पोस्टर प्रदर्शित केलंय. ज्यावर चित्रपटाशी संबंधित अपडेट देण्यात आलीय.
Pushpa 2 New poster
Pushpa 2 New poster Saam Tv

Allu Arjun Pushpa 2 The Rule Movie Update: 'पुष्पा २: द रुल'च्या टीझरने देशभरात खळबळ उडवून दिलीय. टीझर रिलीज झाल्यापासून चाहत्यांना या चित्रपटाविषयी उत्सुकता लागलीय. टीझरमधील अल्लू अर्जुनचा स्टनिंग लूक खूपच लोकप्रिय झालाय. हा चित्रपट कमाईचा नवा टप्पा गाठू शकतो, असा अंदाज टीझरवरून वर्तवला जात आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

नुकतेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर रिलीज केलंय. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा-२' या चित्रपटातील पहिल्या गाण्याची घोषणा करण्यात आलीय. चाहते 'पुष्पा २: द रुल' या गाण्याची खूप दिवसांपासून वाट पाहतायत. यासोबतच निर्मात्यांनी गाण्याचे बोलच्या प्रीव्ह्यूची घोषणा केलीय. प्रीव्ह्यू आज संध्याकाळी ४ वाजता प्रदर्शित केले जाईल. याबाबतची माहिती पोस्टरसोबत देण्यात आलीय.

'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने संगीतामुळेच बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. ही गोष्ट लक्षात ठेवत संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद आणि निर्मात्यांनी सिक्वेलसाठी आणखी एक उत्तम गाणं बनवू असं म्हटलं होतं. यावरून असा अंदाज बांधला जातोय की, पुष्पा-२ मधील अॅक्शनसह गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील.

'पुष्पा २: द रुल' हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती Mythri Movie Makers द्वारे करण्यात आलीय. या चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांचा समावेश आहे. त्याचबरोबर चित्रपटाचा नवा टीझर पाहिल्यानंतर लोक चित्रपट पाहण्यासाठी आणखीनच उत्सुक झालेत.

Pushpa 2 New poster
Pushpa The Rule: 'पुष्पा द रूल'मधील ६ मिनिटांच्या सीनसाठी खर्च केले ६० कोटी, शूटिंगसाठी लागला १ महिना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com