Adah Sharma Birthday : अभिनयासाठी शिक्षण सोडलं, वयाच्या १६ वर्षी बॉलिवूड डेब्यू; अदा शर्मा फेमस केव्हा आली ?

Adah Sharma News : ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा हिचा आज (११ मे) वाढदिवस आहे.
Adah Sharma Birthday
Adah Sharma BirthdayInstagram

‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा हिचा आज (११ मे) वाढदिवस आहे. ती आज आपला ३१ वा वाढदिवस साजरा करीत आहे. अभिनेत्री अदा शर्मा नेहमीच आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते. अदा मुळची मुंबईकर असून तिचा जन्म ११ मे १९९२ रोजी झालेला आहे. आज आपण अदाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या सिनेकरियरबद्दल जाणून घेऊया...

Adah Sharma Birthday
Phullwanti : प्राजक्ता माळीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, 'फुलवंती'चा मोशन पोस्टर रिलीज

अदाने २००८मध्ये रिलीज झालेल्या विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘१९२०’ या हॉरर चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले. तिला चित्रपटातल्या लिसा ह्या व्यक्तिरेखेने विशेष ओळख दिली. त्यावेळी अदा अवघी १६ वर्षांची होती.

‘१९२०’ नंतर, अदा शर्मा बॉलिवूडमधून जवळजवळ गायबच झाली होती. त्यावेळी अदा टॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत होती. या दरम्यान अदाने कमांडो २, कमांडो ३, एस.ओ.सत्यमुर्थी आणि चार्ली चाप्लिनसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

परंतु तिला पाहिजे तसे यश मिळाले नाही. अदा शर्माला सर्वाधिक प्रसिद्धी ‘द केरला स्टोरी’ ने दिली. या चित्रपटापासून तिच्या प्रसिद्धीत खूप मोठी वाढ झाली, त्या बरोबरच तिच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली.

अदाला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. अदाचे वडील मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते. तर तिची आई शास्त्रीय नृत्यांगना आहे. अदा दहावीत असतानाच तिने अभिनेत्री व्हायचं, ठरवलं होतं. अभिनयासाठी तिला शाळा सोडायची होती. पण, आई- वडीलांनी तिला शालेय शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. तिची बारावी पूर्ण झाल्यानंतर तिने शिक्षण सोडले आणि अभिनयात पाऊल ठेवले.

अदा जिम्नॅस्टिक असून ती एक डान्सरही आहे. बालपणापासूनच अदा कथ्थक डान्स करतेय. तिने मुंबईच्या एका कथ्थक डान्स अकादमीमधून कथ्थकमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. यासोबत ती जॅझ, बेली आणि बॅले देखील करते. इतकंच नाही तर, अदा अमेरिकेत चार महिने साल्साही शिकली आहे. अदाच्या डान्सचे व्हिडीओ पाहून चाहते तिच्या स्टाइलकडे आकर्षित होतात.

Adah Sharma Birthday
Ye Re Ye Re Paisa 3: "कुणी पैशात खेळतं, तर कुणी पैशासाठी..!"; 'येरे येरे पैसा ३' ची घोषणा, रिलीज डेटही आली समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com