Ye Re Ye Re Paisa 3: "कुणी पैशात खेळतं, तर कुणी पैशासाठी..!"; 'येरे येरे पैसा ३' ची घोषणा, रिलीज डेटही आली समोर

Ye Re Ye Re Paisa 3 Marathi Movie Release Date Announcement: मॅड कॉमेडी असलेल्या ‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’च्या अभुतपूर्व यशानंतर दिग्दर्शकांनी ‘येरे येरे पैसा ३’ची घोषणा केलेली आहे.
Siddharth Jadhav Starrer Marathi Film Ye Re Ye Re Paisa 3 Marathi Movie Release Date
Siddharth Jadhav Starrer Marathi Film Ye Re Ye Re Paisa 3 Marathi Movie Release DateInstagram

दिग्दर्शक संजय जाधव यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी मराठी प्रेक्षकांना अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. अशातच ‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’च्या अभुतपूर्व यशानंतर दिग्दर्शकांनी ‘येरे येरे पैसा ३’चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. तिसर्‍या भागाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. नुकतंच चित्रपटाचा पोस्टर आणि प्रदर्शनाच्या तारखेबद्दल दिग्दर्शकांनी पोस्ट शेअर करत सांगितले आहे.

Siddharth Jadhav Starrer Marathi Film Ye Re Ye Re Paisa 3 Marathi Movie Release Date
Aayush Sharma On Divorce Rumours : सलमान खानच्या बहिणीचा मोडणार संसार?, आयुष शर्माने सांगितलं मोठं सत्य

"कुणी पैशात खेळतं, तर कुणी पैशासाठी...! पुन्हा मनोरंजनाचा पाऊस पाडायला येत आहे... 'येरे येरे पैसा ३' १ नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात" असं कॅप्शन दिग्दर्शक संजय जाधव यांनी दिलेले आहे. १ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या भागात आनंद इंगळे, तेजस्विनी पंडीत, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार आदी कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

पैसा मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यातून होणारे गोंधळ या पूर्वीच्या दोन्ही चित्रपटात पाहायला मिळाले होते. या दोन्ही चित्रपटांचा प्रेक्षकांची तुफान प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता 'येरे येरे पैसा ३' मध्ये आणखी काय वेगळी कथा दाखवली जाणार याची उत्सुकता आहे. उत्तम अभिनेते या चित्रपटात असल्यानं हा चित्रपट प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार यात काहीच शंका नाही.

Siddharth Jadhav Starrer Marathi Film Ye Re Ye Re Paisa 3 Marathi Movie Release Date
Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा अचानक नेटकऱ्यांवर भडकली, नेमकं असं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com