Pravin Tarade Speech : पुण्यातली राज ठाकरे यांची सभा प्रविण तरडे यांनी गाजवली, पाहा संपूर्ण भाषण

Pravin Tarade News : कालची पुण्याची राज ठाकरेंची सभा मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी गाजवली. भाषणात प्रवीण तरडे यांनी राज ठाकरेंच्या कामाचे आणि त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीचे कौतुक केले.
Pravin Tarade Talking About Raj Thackeray
Pravin Tarade Talking About Raj ThackeraySaam Tv

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची जोरदार हवा आहे. अशातच काल पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ ह्यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही भाषण झाले. आता राज ठाकरेंचे भाषण म्हटल्यावर लाखोंची गर्दी तर होणारच. राज ठाकरे यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चाही होते. पण कालची पुण्याची राज ठाकरेंची सभा मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी गाजवली. भाषणात प्रवीण तरडे यांनी राज ठाकरेंच्या कामाचे आणि त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीचे कौतुक केले.

Pravin Tarade Talking About Raj Thackeray
Pushpa The Rule Theatrical Rights : चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच ‘पुष्पा २: द रुल’ ची कोट्यवधींची कमाई, निर्माते झाले मालामाल; जाणून घ्या कसे

प्रवीण तरडे सभेतल्या भाषणात म्हणाले, "नेमकी ही धडधड माझ्याच वाट्याला आली. ज्यांच्या वाणीवर सरस्वतीचं वरदान आहे, त्या माणसासमोर बोलावं लागतंय. मी माझ्या मित्रासाठी इथं आलोय मुरलीधर मोहोळ माझा मित्र आहे. आमच्या दोस्तीचा पॅटर्न सर्वत्र दूरवर पोहोचवायचा आहे. सालस, सज्जन आणि सुशिक्षित नेतृत्व आपल्याला मिळतंय. माझ्या चित्रपटातील एक डायलॉग घेऊन मी बोलेन, "दोन-दोन वर्ष पाऊस नाही पडला स्वराज्यात, तरी थंडीच्या दवावर ज्वारी, बाजरी काढणारी जात आहे आपली. परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट’ हा डायलॉग बोलायची गरज आता या व्यासपीठावर यासाठी पडली आहे. कारण कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय. पण पुण्याचा रंग इतक्या सहजासहजी बदलू शकत नाही कारण इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बापजाद्याने या स्वराज्यासाठी या पुण्यात रक्त सांडलंय."

भाषणादरम्यान प्रवीण तरडेंनी 'धर्मवीर' चित्रपटातला एक किस्सा सांगितला, "आज साहेब आले आहेत, म्हणून मी एक गोष्ट बोलतो. माझा धर्मवीर चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. त्या चित्रपटातला राज ठाकरेंचा असलेला एक सीन चित्रपटातून कट झाला होता. त्यावेळी अनेक मनसैनिक माझ्यावर नाराज झाले. पण राज ठाकरे यांना त्याचं कारण माहिती आहे.एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अनेक भाषणात याबद्दल सांगितलेलं आहे.राज ठाकरे आमचे आदर्श आहेत. कलाकारांच्या पाठीशी एका पक्षाने किती ठामपणे उभं राहावं, हे या शहरातल्या प्रत्येक कलाकारानं अनुभवलेलं आहे."

Pravin Tarade Talking About Raj Thackeray
Kareena Kapoor : करीना कपूरच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल करण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय ?

"मुरलीधर मोहोळचा मित्र आणि मुळशीचा सुपूत्र म्हणून म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की, पुढील काही वर्ष आपल्याला खंबीर नेतृत्व देईल असं नेतृत्व आपल्याला या निवडणुकीत मिळालेलं आहे. सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करा. मुळशीतल्या मावळ्यांनी मोदींना दिल्लीला पाठवण्याचं ठरवलं आहे. हाच मुळशीचा प्रामाणिकपणा आपल्याला सर्वदूर आहे.", असं प्रवीण यांनी भाषणात सांगितलं. यावेळी प्रवीण तरडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक उदाहरण दिलं.

Pravin Tarade Talking About Raj Thackeray
Abdu Rozik Engagement : 'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा!; फोटो शेअर करत दाखवली बायकोची झलक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com