Spruha Joshi Teach How To Eat Crabs Saam tv
मनोरंजन बातम्या

Spruha Joshi Video: 'पापा केहेते है बडा नाम करेगी...', खेकडा खायला शिकवणाऱ्या स्पृहा जोशीची नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Spruha Joshi Teach How To Eat Crabs: स्पृहा जोशीचा हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Priya More

Marathi Actress Spruha Joshi News:

मराठमोठी अभिनेत्री स्पृहा जोशी (Actress Spruha Joshi) सोशल मीडियावर (Social Media) नेहमी चर्चेत असते. सध्या वेगळ्याच कारणामुळे स्पृहा जोशी चर्चेत आली असून नेटिझन्सनी तिला ट्रोल केले आहे. खेकडा कसा खायचा हे शिकवणाऱ्या स्पृहा जोशीची नेटिझन्सनी अक्षरश: शाळा घेतली आहे. नेमकं हे काय प्रकरण आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

नुकताच स्पृहा जोशीने असोवा या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी स्पृहासोबत अभिनेता विनोद गायकर हा देखील होता. या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी दोन्ही कलाकारांनी मुंबईमधील एका हॉटेलमध्ये नॉनव्हेज फूड खाल्ले. यावेळी स्पृहाने खेकडा कसा खायचा हे सांगितल्याचे दिसत आहे. यावेळी स्पृहा असे सांगितले की, 'खेकडा खाताना फॅन्सी वागू नये...तो हातानेच खायचा.'

स्पृहा जोशीचा हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. असोवा या युट्युब चॅनेलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. याला 'खेकडा कसा खावा? याचं Tutorial by स्पृहा जोशी' असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टवर नेटिझन्सने कमेंट्स करत स्पृहाला ट्रोल केले आहे.

या पोस्टवर 'जोशींची ना तु??', “बाई देवाला तरी घाबर”, 'अरे ही जोशी आहे ना, आणि मांसाहार खाते', 'स्पृहा आजपासून तुला अनफॉलो करतोय', 'अरे श्रावण चालू आहे', 'छान छान खाता हो जोशी खेकडा', 'पापा केहेते है बडा नाम करेगी', 'खेकडा खाके बडा काम करेगी', आणि 'जोशी वडेवाले वाट पाहत आहेत' अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी स्पृहाच्या व्हिडीओवर नाराजी व्यक्त करत तिला ट्रोल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT