Sonalee Kulkarni saam tv
मनोरंजन बातम्या

Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन, शेअर केली भावुक पोस्ट

Sonalee Kulkarni Brother Death : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले. सोशल मीडियावर भावुक पोस्ट करत तिने ही माहिती दिली आहे.

Shreya Maskar

सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

सोनाली कुलकर्णीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे.

सोनालीने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

मराठी चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम तिच्या अभिनयासाठी चर्चेत असते. तिच्या सौंदर्याचे आणि कलेचे लाखो चाहते दिवाने आहेत. तिने आजवर मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये भन्नाट काम केले आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोनाली कुलकर्णी आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे.

सोनाली कुलकर्णीचा चुलत भाऊ अनिरुद्धचं निधन झाले आहे. भावाच्या अचानक जाण्याने सोनालीला धक्का बसला आहे. तिने भावासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिने भावासोबत घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला आहे. भावासोबतचे खास फोटो शेअर केले आहे. एका फोटोत ती भावाला राखी बांधताना दिसत आहे. भावाच्या आठवणीत सोनाली कुलकर्णीने फोटो पोस्ट करून त्याला भावुक कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये नेमकं काय म्हटलं, जाणून घेऊयात.

सोनाली कुलकर्णीची पोस्ट

"आमची अनुमा ❤️

हे जग सोडून एका चांगल्या ठिकाणी गेलास.

तुझ्या आत्म्याला शांती मिळो.

वेदनारहित नवीन जीवन मिळवा.

तू माझ्या आयुष्यातील सर्वात आध्यात्मिक, निष्पाप, सर्वांची काळजी घेणारा, निरागस व्यक्ती होता.

सर्वांशी जोडलेला, सर्वांवर निस्वार्थ प्रेम करणारा.

सर्व गाणी मनापासून ऐकणारा, तबला वाजवणारा, सोबत कायम हातात चहा असायचा...

माझ्यासोबत राहिल्याबद्दल आणि सर्वांना प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. खूप प्रेम...

ॐ शांति "

सोनालीने शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट करून नेटकऱ्यांनी भावाला श्रद्धांजली वाहली आहे. तसेच सोनाली आणि तिच्या कुटुंबासाठी चिंता व्यक्त केली आहे. सोनालीचे चाहते आता तिच्या नवीन प्रोजेक्टची वाट पाहत आहेत. लवकरच तिचा 'तिघी' हा चित्रपट थिएटरमध्ये येणार आहे. चित्रपट 6 मार्च 2026 ला रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाण्यात अगरबत्ती विकणाऱ्याकडून दुकानात चोरी; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Asha Bhosle: 9 व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले अन् 16 व्या वर्षी लग्न; आशा भोसले यांचा थक्क करणारा जीवनप्रवास

Aasha Bhosale: आशा भोसलेंनी बॉलिवूडमध्ये डेब्यू कधी केला? त्यांचं शेवटचं गाणं कोणतं?

Asha Bhosle Death: सदाबहार आवाजाची जादू, आशा भोसलेंची प्रसिद्ध गाणी कोणती, कसा होता गाण्याचा प्रवास?

आशा भोसलेंनी केली होती वयाच्या १० व्या वर्षी संगितविश्वात एन्ट्री; ८ दशकात किती गाणी गायली?

SCROLL FOR NEXT