Gulaabi Movie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gulaabi Poster: विचारांचा, वागणकुीचा, स्वप्नांचा आणि नात्यांचा 'गुलाबी' प्रवास, श्रुती मराठेने केली नव्या चित्रपटाची घोषणा

Gulaabi Movie Announcement: चित्रपटाच्या पोस्टरवरून, नावावरून हा चित्रपट तीन मैत्रिणींची कथा सांगणारा असल्याचे दिसत असला तरी तिघींची पार्श्वभूमी वेगळी आहे. त्यामुळे यात काहीतरी वेगळे पाहायला मिळणार हे नक्की.

Priya More

Gulaabi Movie:

जागतिक महिला दिनाच्या (International Womens Day) निमित्ताने व्हॉयलेट फ्लेम मोशन पिक्चर्स निर्मित 'गुलाबी' या चित्रपटाची (Gulaabi Film) नुकताच घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे स्वप्नील भामरे, अभ्यंग कुवळेकर, शीतल शानभाग आणि सोनाली शिवणीकर निर्माते आहेत. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत त्याची घोषणा करण्यात आली आहे.

'गुलाबी' या चित्रपटामध्ये अभिनेत्री श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवरून, नावावरून हा चित्रपट तीन मैत्रिणींची कथा सांगणारा असल्याचे दिसत असला तरी तिघींची पार्श्वभूमी वेगळी आहे. त्यामुळे यात काहीतरी वेगळे पाहायला मिळणार हे नक्की.

अभिनेत्री श्रृती मराठेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या मोशन पोस्टरमध्ये चित्रपटातील कलाकारांची नावं दाखवण्यात आली आहेत. या चित्रपटाचे मोशन पोस्टर देखील चित्रपटाच्या नावाप्रमाणे गुलाबीच आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत श्रृती मराठेने कॅप्शनमध्ये 'विचारांचा, वागणकुीचा, स्वप्नांचा आणि नात्यांचा गुलाबी प्रवास!' असे लिहित 'गुलाबी'चे चित्रीकरण सुरू झाल्याची माहिती तिने दिली. तिच्या या पोस्टला पसंती देत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर यांनी सांगितले की, 'आज आमच्या चित्रपटाची घोषणा होतेय. चित्रपट स्त्रीप्रधान असला तरी यात मनोरंजनही आहे. हळूहळू चित्रपटातील अनेक गोष्टी समोर येतीलच. सध्या तरी एकच सांगेन अतिशय प्रतिभाशाली अभिनेत्री यात अभिनय करत आहेत.' या चित्रपटाची घोषणा झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नेत्याची भररस्त्यावर गोळ्या झाडून हत्या, कुटुंबाला वेगळाच संशय, हत्येमागे भाजपचा हात असल्याचा आरोप

Maharashtra Live News Update: 'जीआर रद्द करावा' जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समता परिषदेकडून निदर्शने

Kolhapur Gazette : जरागेंना बळ मिळाले! मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री, कुणबी अन् मराठाबाबत महत्त्वाची नोंद

Taloda Heavy Rain : तळोदा तालुक्यात अतिवृष्टी; २४ तासांपासून पावसाची संततधार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Viral Video : क्षुल्लक कारणावरून सुरू झालं भांडण नंतर दे दणादण; त्या हॉटेलबाहेर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT