Famous Actress Photos saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actress Photos : हातात वॉकर अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पायाला गंभीर दुखापत, अवस्था पाहून चाहते चिंतेत

Famous Actress Leg Injury : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तिने फोटो शेअर करून आपले हेल्थ अपडेट दिले आहे. नेमकं काय झालं, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

हातात वॉकर घेऊन अभिनेत्रीने फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री टिव्ही इंडस्ट्रीचा प्रसिद्ध चेहरा आहे.

टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर दुखापत झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून तिने या संबंधित माहिती चाहत्यांना दिली आहे. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या पायाला दुखापत झाली आहे. तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. सध्या ती 'शंकर जयकिश' या नाटकामुळे चांगलीच चर्चेत आहे. पायाला दुखापत झाली असतानाही अभिनेत्रीने नाटकाचा प्रयोग केला आहे.

शिवानी रांगोळेचे पोस्ट

"नाटक करायला एका पायावर तयार, पायाला दुखापत झाली तेव्हा प्रयोग कसे होणार ह्याचं टेन्शन होतं. पण नाट्यगृहात पाय ठेवण्याच्या क्षणापासून ते मेकअप रूममध्ये मला तयार होताना मदत करणं, नाटका आधीचा जो प्रॉपर्टी चेक मी करते तो माझ्या वतीने करून ठेवणं, मला चालायला वेळ लागतो म्हणून ब्लॅकआउटचा अवधी वाढवणं, नाटकात काही मूव्हमेंट्स ऐनवेळी माझ्या सोयीनी बदलणं, नाटक झाल्यावर मला गाडीपर्यंत सुखरूप सोडणं, हे सगळं माझ्या शंकर जयकिशनच्या सगळ्या टीमनी केलं...

मला कित्येकदा पायात splinter आहे ह्याची जाणीव ही व्हायची नाही, उत्साहात मी स्टेजवर वावरायचे तेव्हा भरत जाधव सर आणि महेश मांजरेकर सर मला आठवण करून द्यायचे, मला सांभाळून घ्यायचे...तेव्हा खूप कृतज्ञता वाटली! स्टेज वर जाईपर्यंत टेन्शन असायचं की पायामुळे प्रयोग कसा होईल, पण एकदा प्रेक्षकांचा आवाज ऐकला की हुरूप यायचा! आता हळूहळू recovery होते आहे पण माझ्या टीमसाठी आणि प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात!"

शिवानी रांगोळेने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स करून तिचे कौतुक करत आहेत. तसेच तिच्या तब्येतीची विचारपूस करत आहे. लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.

वर्कफ्रंट

अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने आजवर मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. 'शंकर जयकिश' नाटकात ती मराठी दिग्गज अभिनेते भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्यासोबत झळकली आहे. तसेच अलिकडेच ती 'बे दुने तीन' या चित्रपटात झळकली आहे. तिला आपल्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT