Sanskruti Balgude Donate Hairs Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sanskruti Balgude Donate Hairs : कौतुकास्पद! संस्कृती बालगुडे कॅन्सर पेशंटला केस दान करणार; निर्णयाचं होतंय कौतुक

Sanskruti Balgude News : गेल्या काही दिवसांपूर्वी तिने बॉबकट करत फोटोशूट केलं होतं. पण हे फोटोशूट तिने चित्रपटासाठी केलं असल्याची चर्चा, चाहत्यांमध्ये झाली होती.

Chetan Bodke

वैविध्यपूर्ण भूमिका असो किंवा फॅशन मधील वेगळेपणा या आणि अशा अनेक गोष्टींमुळे संस्कृती बालगुडे तिच्या फॅशन आणि उत्तम अभिनयामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर संस्कृती कायमच तिच्या हटक्या फॅशनमुळे चर्चेत असते. सध्या तिच्या फॅशनची चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने बॉबकट करत फोटोशूट केलं होतं. पण हे फोटोशूट तिने चित्रपटासाठी केलं असल्याची चर्चा, चाहत्यांमध्ये झाली होती. पण आता अभिनेत्रीने स्वत: त्या फोटोशूटवर सविस्तर भाष्य केलं आहे.

हेअरस्टाईलबद्दल संस्कृती बालगुडेने सांगितलं की, "नव्या भूमिकेसाठी हेअरकट करणं ही गोष्ट माझ्यासाठी खरंतर खूप धाकधूक होती. मनात कुठेतरी होत की आपल्याला हे झेपणार आहे का ? मी पहिल्यांदाच एवढे शॉर्ट हेअर्स केलेले आहे. खरंतर, हा लूक करताना माझ्या मनामध्ये फार धाकधूक होती. शॉर्ट हेअर सांभाळण्यासाठी किती सोप्पं आहे, हे मला समजलं आहे. मी या नव्या लूकमध्ये फारच वेगळी दिसतेय. मी या लूकमध्ये कशी दिसते हे पाहण्यासाठी मी फारच उत्सुक होते. या लूकमध्ये मी खूपच वेगळे दिसते."

"मी खरंतर हा बॉबकट लूक एका चित्रपटासाठी केलेला आहे. हा चित्रपट माझ्यासाठी खूपच खास असून या नव्या चित्रपटासाठी मी खूपच उत्सुक आहे. यातून काहीतरी वेगळेपणा तुम्हाला एक प्रेक्षक म्हणून सुद्धा अनुभवता येणार, यात शंका नाही."

"नव्या भूमिकेसाठी हा नवा लूक तर आहे, पण फिल्म खूप उत्तम लिहिली गेली. खरं सांगायचं तर, मा‍झ्या डोक्यात नव्हतं की कॅन्सर पेशंटला केस दान करावे. केस कापण्याच्या दोन- तीन दिवस आधी मी इन्स्टाग्राम स्क्रोल करत होते."

"तेव्हा मी बघितलं काही मुली त्यांचे कापलेले केस हे दान करत होत्या. यातून हा विचार आला आणि मग हा निर्णय घेतला की आपण आपले केस कॅन्सर पेशंटला दान करावे. अगदी ते थोडे असतील पण ते दान करून यातून काहीतरी घडू शकतं म्हणून मी माझे केस दान केले."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT