Prajakta Gaikwad Wedding Video saam tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Gaikwad Wedding Video : सनईचे घुमले सूर...; प्राजक्ता गायकवाडची लगीनघाई, हातात भरला हिरवा चुडा

Prajakta Gaikwad Wedding Rituals Start : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. नुकताच घाणा-बांगड्या भरण्याचा कार्यक्रम थाटात पार पडला आहे.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्न बंधानात अडकणार आहे.

प्राजक्ता गायकवाडच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे.

प्राजक्ता गायकवाडच्या हातात हिरवा चुडा भरला आहे.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांचा 2 डिसेंबर 2025ला शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मराठी ऐतिहासिक मालिकेतून प्राजक्ता गायकवाड प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. मालिकेत प्राजक्ता गायकवाडने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती.

ऑगस्ट महिन्यात प्राजक्ताने थाटामाटात साखरपुडा करून आपल्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून दिली. आता प्राजक्ताच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे. नुकताच घाणा-बांगड्या भरण्याच्या कार्यक्रम थाटामाटात पार पडला आहे. या सोहळ्याला प्राजक्ताचे कुटुंब आणि जवळचे नातेवाईक पाहायला मिळाले. प्राजक्ताने सुंदर पारंपारिक साज केला होता.

प्राजक्ताचा लूक

घाणा-बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमासाठी प्राजक्ताने पारंपरिक लूक केला होता. तिने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा भरला आहे. केसांचे सुरेख वेणी, नाकाथ नथ असा मराठमोळा साज-शृंगार तिने केला आहे. प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाचा शुभ मुहूर्त दुपारी 12.24 चा आहे. तर त्यांचा शाही विवाह सोहळा पुण्यात खराडी येथे पार पडणार आहे. तर 1 डिसेंबरला हळदी आणि संगीत सोहळा पार पडणार आहे. प्राजक्ता गायकवाडचा होणारा नवरा शंभूराज खुटवड एक उद्योगपती आहे. तसेच पैलवान देखील आहेत. खुटवड कुटुंब राजकारणात सक्रिय आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शंभूराज खुटवड हा पुण्याच्या फुरसुंगी येथे राहणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

SCROLL FOR NEXT